Sun, Jul 21, 2019 16:19
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › मालेगाव @ ४२

मालेगाव @ ४२

Published On: Apr 18 2018 12:52AM | Last Updated: Apr 18 2018 12:52AM
मालेगाव : प्रतिनिधी

एप्रिलच्या मध्यावर शहर परिसरात उष्णतेची लाट येऊ पाहत आहे. मालेगावात पारा 42 अंशांवर पोहोचल्याने यंदा भुसावळपाठोपाठ शहरातही तापमानाचा उच्चांक प्रस्थापित होतो की काय विचारानेच मालेगावकरांना घाम सुटत आहे.
सकाळी 9 वाजताच उन्हाचा कडाका सुरू होतो. भरदुपारी घराबाहेर पडणे त्रासदायक ठरत आहे. शासकीय कार्यालय, खासगी आस्थापनांचा अपवाद वगळता दुपारच्या सत्रात वर्दळ रोडावत आहे. 2015 मध्ये 20 एप्रिलच्या दरम्यान शहरातील तापमानाने 43.5 अंशापर्यंत मजल मारली होती. तर, 2013 मध्ये याच दिवसात 45 अंश सेल्सिअसपर्यंत भुसावळकरांनी उष्णतेच्या झळा सोसल्या होत्या. त्या दिशेनेच मालेगावचे तपमान वाटचाल करत असले तरी, हवामान खात्याच्या अंदाजानुसार बुधवारीदेखील उष्मा कायम राहिल. मात्र गुरुवारी एक अंशाने पारा घसरून 41 अंशावर येण्याची शक्यता आहे. 

Tags ; Nashik, Malegaon,  42