होमपेज › Nashik › महिंद्राच्या वाहनांचे सुटे भाग रस्त्यावर; वाहतूक खोळंबली

नाशिक : महिंद्राच्या वाहनांचे सुटे भाग रस्त्यावर; वाहतूक खोळंबली

Published On: Jan 20 2018 8:03PM | Last Updated: Jan 20 2018 8:03PMसातपूर : वार्ताहर

सातपूर औद्योगिक वसाहतीतील महिंद्रा अँण्ड महिंद्रा कंपनीमध्ये स्पेअरपार्ट पुरवणाऱ्या वाहनांचे काही सुटे भाग शनिवारी सायंकाळी रहदारीच्या ञ्यंबकररोडवरील मुख्य रस्त्यावर पडले. त्‍यामुळे काही काळ वाहतूळ विस्कळीत झाली होती. सुदैवाने मोठा अपघात टळला असून, सातपूर पोलिसांनी वेळीच धाव घेवून वाहतूक सुरळीत केली. 

याबाबत अधिक माहिती अशी की, सातपूर येथील महिंद्रा अँण्ड महिंद्रा कंपनीत तयार होणाऱ्या चार चाकी वाहनांचे सुटे भाग ने-आण करण्याचे काम मुंबई-कांदिवली येथील विराग लॉजिस्टीक ट्रान्सपोर्ट कंपनीकडे आहे. शनिवारी (दि.20) महिंद्राच्या वाहनांचा महत्वपूर्ण समजला जाणारा एक्सल हा पार्ट कांदिवलीवरुन ट्रान्सपोर्टच्या खुल्या ट्रकमधून सातपूर येथील महिंद्रा प्लान्टमध्ये पोहचविण्यात येत होता. दरम्यान, ञ्यंबकरस्त्यावरील समृध्दनगर येथील सुला वाईन चौकातील मोक्याच्या वळणावर ट्रकमध्ये बांधलेले एक्सल तुटून थेट रस्त्यावर फेकले गेले. सुदैवाने अपघात होण्यापासून वाचला. माञ, काही काळ वाहतूक खोळंबा झाला. घटनास्थळी महिंद्रा कंपनीच्या सुरक्षा रक्षकांनी धाव घेत मदत केली. खासगी फोरक्लीप चालकाच्या साहाय्याने एक्सल ट्रकवर चढविण्यात आले.