होमपेज › Nashik › पोलीस अकादमीचे रुपडे पालटणार

पोलीस अकादमीचे रुपडे पालटणार

Published On: Feb 18 2018 2:00AM | Last Updated: Feb 18 2018 12:48AMनाशिक : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळातर्फे महाराष्ट्र पोलीस अकादमीसाठी सुमारे एक करोड रुपयांची कामे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार अकादमीतील विविध इमारतींचे नूतनीकरण आणि पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत अकादमीचे रुपडे पालटणार आहे.

महाराष्ट्र पोलीस अकादमी येथे अकादमी कॉम्प्लेक्स व क्‍लासरूमसह इमारतीचे बांधकाम आणि पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी महामंडळाने 70 लाख 16 हजार रुपयांचा खर्च अपेक्षित केला आहे. यामुळे प्रशिक्षणार्थींना अत्याधुनिक दर्जाचे शिक्षण घेण्यासाठी त्या सोयी सुविधा उपलब्ध होणार आहेत. त्याचप्रमाणे गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालयाच्या प्रशासकीय इमारतीचे बांधकामही करण्यात येणार असून, त्यासाठी 25 लाख 55 हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

या कामांमुळे अकादमीमध्ये पायाभूत सुविधा पुरवण्यात येत असून, जेणेकरून अधिकारी आणि प्रशिक्षणार्थींना त्याचा फायदा होईल. या कामांच्या महामंडळाने ई-निविदा काढल्या आहेत. विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयात उभारण्यात आलेल्या बहुद्देशीय हॉलमध्येही फर्निचर, विद्युतीकरण, ध्वनिविषयक कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाने एक लाख 21 हजार रुपयांचा खर्च अपेक्षित ठेवला आहे.