Sun, Apr 21, 2019 04:22होमपेज › Nashik › मनसेचे योगेश शेवरे सातपूर प्रभाग सभापतीपदी बिनविरोध

मनसेचे योगेश शेवरे सातपूर प्रभाग सभापतीपदी बिनविरोध

Published On: Apr 20 2018 12:49PM | Last Updated: Apr 20 2018 12:49PMसातपूर : वार्ताहर

भाजप व शिवसेनाच्या उमेदवारानी  माघार घेतल्याने  सातपूर प्रभाग सभापतीपदी मनसेच्या योगेश शेवरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.त्यांच्या निवडीनंतर विभागीय कार्यलयाबाहेर फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला.

पिठासीन आधिकारी तथा जिल्हाधिकारी  बी राधाकृष्णन  यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी  १०.३० वाजता सातपूर प्रभाग सभाग्रहात सभापती निवडणुकीच्या कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली.यावेळी नगरसचिव जी आर अव्हाळे ,विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड आदि ऊपस्थित होते.सभेचे कामकाज सुरू केल्यावर निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदांराना माघारीसाठी १५ मिनीटांचा अवधी देण्यात आला.अवधी संपल्यावर भाजप व शिवसेनेच्या दोन्हि उमेदांरानी माघार  घेतल्याने प्रभाग सभापतीची निवड बिनविरोध  करण्यात आली.सर्व उपस्थित नगरसेवकांनी बाके वाजवून आनद व्यक्त केला. सातपूर विभागात एकूण २० नगरसेवक निवडून आले आहेत. यामध्ये भाजपाचे ९, शिवसेनेचे ८, मनसेचे २ तर रिपाई चे १ असे संख्याबळ आहे.यावेळी शिवसेनेचे नगरसेवक दिलीप दातीर व हर्षदा गायकर यांची अनुपस्थिती होते. प्रथमच नगरसेवक म्हणून निवड आलेले  योगेश शेवरे यांना वैदयकीय व आरोग्य समितीच्या उपसभापती  पोटोपाठ सातपूर प्रभाग सभापती पदाची माळ गळ्यात पडल्याने समर्थक आनंद व्यक्त करीत आहे. 

सातपूर प्रभागसभापती म्हणून सर्व सदस्यांनी माजी बिनविरोध निवड केली यासाठीसर्वांचे आभार मानतो. व मला मिळालेल्या संधीचा वापर मी सातपूर परिसरात जास्तीत-जास्त विकास कामे करण्यासोबतच सातपूर परिसर कचरामुक्त कसा होईल. व मूलभूत समस्या सोडविण्या कडे जास्त लक्ष देणार असल्याचे योगेश शेवरे यांनी सांगितले.

यावेळी  शिवसेनेचे गटनेते तथा नगरसेवक विलास शिंदे,मनसे गटनेते सलीमामा शेख,संतोष गायकवाड, नैना गांगुर्डे, राधा बेंडकुळे, भागवत आरोटे, सीमा निगळ,  रिपाईच्या दीक्षा लोंढे, माधुरी बोलकर, शशिकांत जाधव, पल्लवी पाटील, दिनकर पाटील, हेमलता कांडेकर, रविंद्र धिवरे, वर्षा भालेराव, अलका आहेर, सुदाम नागरे, आदी नगरसेवक  उपस्थित होते.

नूतन सभापती योगेश शेवरे यांचा सत्कार महापौर रंजना भानसी उपमहापौर प्रथमेश गीते,अशोक मुर्तडक,राहुल ढिकले,सभाजी मोरूस्कर, अनिल मटाले,विक्रम नागरे,भाजप शहर उपाध्यक्ष रामहरि संभेराव,मिलीद कांबळे,प्रकाश निगळ.निलेश राऊत आदीनी पुष्पगुच्छ देऊन केला योगेश शेवरे यांचे स्वागत केले.

Tags : MNS, Corporator, Yogesh Shevare, Elected, Chairperson, Satpur, Nashik