होमपेज › Nashik › नाशिक : निफाडच्या आमदारांची दुचाकी लंपास

नाशिक : निफाडच्या आमदारांची दुचाकी लंपास

Published On: Apr 25 2018 12:57AM | Last Updated: Apr 25 2018 12:09AMओझर :

अनेक दिवसांपासून ओझर परिसरात दुचाकीचोरांनी उच्छाद घातलेला असताना आता या चोरट्यांनी निफाडचे आमदार अनिल कदम यांच्या बंगल्याच्या आवारातून त्यांची दुचाकी चोरल्याची फिर्याद आमदार कदम यांचे चालक एकनाथ घोलप यांनी ओझर पोलीस ठाण्यात दिली. आमदार कदम यांचा जुना सायखेडा रस्त्यावर बंगला आहे. सोमवारी (दि.23) रात्री 9.30 वाजता बंगल्याच्या आवारात हीरो होंडा कंपनीची लाल-काळ्या रंगाची दुचाकी (क्र. एमएच-15-सीपी-7711) लावलेली होती.

मंगळवारी (दि. 24) सकाळी 8 वाजता कदम परिवारातील सदस्यांच्या गाडी जागेवर नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी गाडीची शोधाशोध केली असता गाडी मिळून आली नाही. याबाबत आमदार कदम यांच्या चालकाने अज्ञात चोरट्यांच्या विरोधात ओझर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. दरम्यान, ही दुचाकी आमदार कदम यांचे वडील साहेबराव भाऊराव कदम यांच्या नावावर असल्याचे समजते. सहायक पोलीस निरीक्षक एन. सी. माळोदे तपास करीत आहेत.