Fri, Apr 26, 2019 01:55होमपेज › Nashik › आमदार घोलप यांनी राजीनामा द्यावा

आमदार घोलप यांनी राजीनामा द्यावा

Published On: Jul 31 2018 1:34AM | Last Updated: Jul 31 2018 12:04AMउपनगर : वार्ताहर

मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मराठा समाजबांधवांनी देवळाली मतदारसंघाचे आमदार योगेश घोलप यांच्या घराबाहेर प्रचंड घोषणाबाजी केली. ज्या मराठा समाजाने घोलप यांना या मतदारसंघात पाय रोवण्यासाठी मदत केली, त्या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आमदार घोलप यांनी पदाचा राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी आंदोलकांनी केली.

यावेळी माजी आमदार बबन घोलप यांनी समाजाची मागणी मान्य असून, पक्षाच्या आदेशाप्रमाणे राजीनामा देऊ, असे आमदार योगेश घोलप यांचे मत जाहीर केले.  सकाळी 11 वाजता लॅमरोडच्या आमदार घोलप यांच्या घराबाहेर सकाळी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी समाजाच्या बांधवांनी आ. घोलप यांनी मराठा आरक्षण मिळावे म्हणून आपल्या आमदारकीचा त्याग करावा, अशी भूमिका मांडली. 

यावेळी माजी आमदार बबनराव घोलप यांनी आपण मराठा समाजाच्या मागे असून, आपली मागणी रास्त आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवे त्यांना शिक्षण आणि नोकर्‍यांमध्येही सोयी सवलती मिळायला हव्या, असे वाटते. मराठा समाजाच्या बळावर आम्ही आमदार झालो आहे म्हणून समाजाची भूमिका रस्ता असून, वेळ आल्यास राज्यपाल किंवा विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा देऊ, अशी भूमिका आमदार घोलप यांच्या वतीने विषद केली. यावेळी करण गायकर, योगेश निसाळ, गणेश कदम, राजेंद्र लांडगे, डॉ. अमोल वाजे, उमेश शिंदे, विलास कानमहाले, प्रकाश म्हस्के आदी मराठा समाजबांधव कार्यकर्ते उपस्थित होते.