Fri, Mar 22, 2019 06:07
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › जिल्ह्यात आता भुजबळ समर्थक जोडा अभियान

जिल्ह्यात आता भुजबळ समर्थक जोडा अभियान

Published On: Jan 28 2018 1:33AM | Last Updated: Jan 27 2018 10:52PMनाशिक : प्रतिनिधी

आमदार छगन भुजबळ यांच्यावर होणार्‍या अन्यायाच्या निषेधार्थ शहरातील प्रत्येक प्रभागात तसेच ग्रामीण भागात ‘अन्याय पे चर्चा’ करून भुजबळ समर्थक जोडो अभियान यशस्वी करण्याचा निर्धार समन्वय समितीच्या बैठकीत घेण्यात आला. भुजबळ फार्म येथील कार्यालयात शहर व जिल्ह्यातील समन्वयकांची बैठक पार पडली.

यावेळी आमदार नरहरी झिरवाळ, अंबादास बनकर, साहेबराव पाटील, दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, राधाकिसन सोनवणे, विष्णुपंत म्हैसधुणे, प्रकाश वडजे, जिल्हा परिषद सदस्य हिरामण खोसकर, मधुकर जेजुरकर, उदय जाधव, नितीन पवार, यतीन पगार, प्रकाश वाघ, ढवळू फसाळे, कल्पना पांडे, कविता कर्डक, ज्ञानेश्‍वर गायकवाड, योगेश कमोद, संजय खैरनार, मुख्तार शेख, निवृत्ती अरिंगळे, संजय साबळे, मनोहर कोरडे, बाळासाहेब वाघ, नगरसेविका शोभा साबळे, रवी पगारे, विश्‍वास कांबळे, माजी नगरसेवक वैशाली दाणी, कैलास मुदलियार, ज्ञानेश्‍वर काळे, संतोष कमोद, संदीप शिंदे, प्राचार्य विजय थोरात, सुनील पाटील, सचिन मंडलिक, वैभव देवरे, धीरज मगर, राहुल तुपे यांच्यासह शहर व जिल्ह्यातील समन्वयक उपस्थित होते. नाशिक शहरातील सर्व प्रभागातील समन्वयक तसेच जिल्हा पातळीवर प्रत्येक तालुक्यात समन्वयकांच्या नेमणुका करण्यात आल्या. 

यावेळी नाशिक शहराची नाशिकरोड, सिडको, पंचवटी, सातपूर, मध्य आणि पश्‍चिम अशा सहा विभागांत विभागणी करून विभागात प्रत्येकी 10 कार्यकर्त्यांची फळी निर्माण करण्यात आली. या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागात प्रत्येकी 20 बैठका घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. गावागावांत बैठका घेण्याचे नियोजन करण्यात आले. बैठका घेत असताना गावगावांत दवंडी देऊन भुजबळ यांच्यावर झालेल्या अन्यायाबाबत माहिती दिली जाणार असून, बैठकांचे नियोजन करण्यात येणार आहे.