Sat, Mar 23, 2019 16:06होमपेज › Nashik › कार्यकर्त्यांनो, आतापासूनच कामाला लागा!

कार्यकर्त्यांनो, आतापासूनच कामाला लागा!

Published On: May 15 2018 1:35AM | Last Updated: May 15 2018 12:02AM सिडको : प्रतिनिधी

जिल्ह्यातील काही कार्यक्रमांना शक्य असेल तिथे मी स्वतः उपस्थित राहील, परंतु आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकविण्यासाठी कार्यकर्त्यांनो जोमाने कामाला लागा, असे आवाहन पक्षाचे नेते व माजी उपमुख्यमंत्री तथा आमदार अजित पवार यांनी केले.

सिडकोतील खुटवडनगर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हा कार्याध्यक्ष वैभव देवरे व पदाधिकार्‍यांच्या हस्ते पवार यांचे स्वागत करण्यात आले. जिल्ह्यातील युवा पदाधिकार्‍यांनी पवार यांना पक्ष प्रवेश व पक्षबांधणी मोठ्या प्रमाणात करू व नाशिक जिल्हा राष्ट्रवादीमय करू, अशी ग्वाही दिली. यावेळी रायुकाँचे शहराध्यक्ष अंबादास खैरे, हर्षल चव्हाण, अजय पाटील, अमोल नाईक, निखिल पवार, अक्षय परदेशी आदी युवा कार्यकर्ते उपस्थित होते.