Wed, Aug 21, 2019 14:46होमपेज › Nashik › विहिरीत उडी मारून प्रेमी युगुलाची आत्महत्या

विहिरीत उडी मारून प्रेमी युगुलाची आत्महत्या

Published On: Jan 17 2018 7:48PM | Last Updated: Jan 17 2018 7:48PM

बुकमार्क करा
धुळे : प्रतिनिधी

साक्री तालुक्यातील दातर्ती गावाच्या शिवारात वनविभागाला लागून असलेल्या विहिरीत प्रेमी युगुलाने उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या दोघांचे मृतदेह मंगळवारी (दि.16) रात्री उशिरा विहिरीतून  बाहेर काढण्यात आले. यानंतर बुधवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलीने तिच्या वडिलांच्या नावाने लिहिलेल्या चिठ्ठीमधे त्या मुलावर प्रेम असल्याचे नमूद केले आहे. हे प्रेमीयुगुल दातर्ती गावात एकाच गल्लीत रहात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.