Sat, Mar 23, 2019 18:07होमपेज › Nashik › ‘लोकमाता गोदावरी’ प्रकल्प गुंडाळला

‘लोकमाता गोदावरी’ प्रकल्प गुंडाळला

Published On: Aug 23 2018 1:28AM | Last Updated: Aug 22 2018 11:14PMनाशिक : प्रतिनिधी

अत्यंत महत्त्वाकांक्षी व गेल्या तीन वर्षांपासून कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या संकेतस्थळावर झळकत असलेला ‘लोकमाता गोदावरी’ प्रकल्प अखेर गुंडाळण्यात आला आहे. राज्य शासन, मुक्‍त विद्यापीठाकडे वारंवार पाठपुरावा करूनही त्यासाठी आर्थिक सहाय्य मिळत नसल्याने प्रतिष्ठानच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांनी अत्यंत व्यथित अंत:करणाने ही घोषणा केली.

कुसुमाग्रज प्रतिष्ठानची सन 2017-18 ची वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी (दि. 22) कुसुमाग्रज स्मारक येथे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत कर्णिक    8यांनी कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे संकल्पित ङ्गलोकमाता गोदावरीफ व ङ्गसांस्कृतिक नाशिकफ हे दोन्ही प्रकल्प बंद करीत असल्याचे जाहीर केले. सुमारे तीन वर्षांपूर्वी प्रतिष्ठानचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर कर्णिक यांनी या दोन्ही प्रकल्पांची संकल्पना मांडली होती. नाशिक व महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत गोदावरी नदीचे महत्त्व मोठे आहे. या नदीची प्राचीनता, तिच्या काठावरील तीर्थक्षेत्रे, मंदिरे, मठ, घाट, विद्या, कला, साहित्य, ग्रामीण व नागरी संस्कृती (प्राचीन व अर्वाचीन) पिके, फलोद्याने, प्राणिजीवन, जैविकता, पर्यावरण व प्रदूषण, जलप्रकल्प, धरणे, महापूर या सार्‍या बाबींतून उभ्या राहिलेल्या समृद्ध संस्कृतीचा समग्र आढावा घेणारा ङ्गलोकमाता गोदावरीफ हा ज्ञानकोश-माहितीकोश तयार केला जाणार होता. हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी सुमारे तीन कोटी रुपयांच्या निधीची गरज होती. प्रारंभी मुक्‍त विद्यापीठाने यासाठी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली होती.

यासंदर्भात दोन-तीन बैठकाही झाल्या होत्या. मात्र, त्यानंतर मुक्‍त विद्यापीठाकडून नकारघंटा आल्याचे कळते. कर्णिक यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला. मात्र, सकारात्मक प्रतिसाद लाभला नाही. त्यामुळे अखेर कर्णिक यांनी हा प्रकल्प बंद करीत असल्याचे जड अंत:करणाने सांगितले.  विशेष म्हणजे, या प्रकल्पाची माहिती गेल्या तीन वर्षांपासून प्रतिष्ठानच्या संकेतस्थळावर झळकते आहे. मात्र, निव्वळ माहिती प्रसिद्ध करण्यापलीकडे या प्रकल्पासाठी प्राथमिक स्तरावरही हालचाली झाल्या नसल्याचे यावेळी समोर आले. साहित्य क्षेत्रात आपला अमीट ठसा उमटवणार्‍या मधु मंगेश कर्णिक यांच्या संकल्पनेतून पुढे आलेला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प गुंडाळावा लागत असल्याने खंत व्यक्‍त केली जात आहे.