Sun, Nov 18, 2018 23:58होमपेज › Nashik › नाशिकः नरबळी प्रकरणी ११ जणांना जन्मठेप

नाशिकः नरबळी प्रकरणी ११ जणांना जन्मठेप

Published On: Dec 05 2017 7:54PM | Last Updated: Dec 05 2017 8:20PM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी        

चेटकीन आहेस या कारणावरूण दोन सख्ख्या बहिणींना लाथांनी तुडवून मारणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील टाके हर्ष येथील ११ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायाधीश यू़. एम. नंदेश्वर यांनी मंगळवारी (दि.५) शिक्षा सुनावली. आरोपींमध्ये मयत महिलेच्या दोन मुलांचाही समावेश असून, महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट-अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायदा- २०१३ अन्वये देण्यात आलेली राज्यातील ही पहिलीच शिक्षा आहे़

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील टाके हर्ष येथील रहिवासी बुगीबाई पुनाजी दोरे (टाके हर्ष, ता. इगतपुरी, जि. नाशिक) व तिची बहीण काशीबाई भिका वीर (रा. मोखाडा) यांची ऑक्टोबर २०१४ मध्ये आरोपींनी लाथांनी तुडवून ठार मारले होते. दोघींचे मृतदेह डहाळेवाडी येथील एका शेतात पुरण्यात आले होते. या प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जादूटोणा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

बच्चीबाई खडके, बुग्गी वीर, लक्ष्मण निरगुडे, नारायण खडके, वामन निरगुडे, किसन निरगुडे, गोविंद मोरे, काशीनाथ दोरे, महादू वीर, हरी निरगुडे, सनीबाई निरगुडे (सर्व रा. टाके हर्ष, ता. इगतपुरी, जि. नाशिक) अशी या आरोपींची नावे आहेत.