Thu, Aug 22, 2019 12:39होमपेज › Nashik › शहर बसवाहतुकीसाठी मनपाला सहकार्य करू

शहर बसवाहतुकीसाठी मनपाला सहकार्य करू

Published On: Dec 27 2017 1:22AM | Last Updated: Dec 26 2017 11:57PM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

शहर विकासासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था खूप महत्त्वपूर्ण आहे. परिवहन महामंडळ  शहर वाहतूक सेवा चालविण्यास तयार नाही. त्यामुळे महापालिकेने इतर शहरांप्रमाणे शहर बससेवेची जबाबदारी घ्यावी, राज्य शासन महापालिकेच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

डोंगरे वसतिगृह मैदानावर क्रेडाईतर्फे सुरू असलेल्या शेल्टर प्रदर्शनाचा समारोप मुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते.  सार्वजनिक वाहतूक व्यवस्था महापालिकेने घ्यावी, यासाठी लवकरच मुंबईला बैठक घेण्यात येईल. त्यानंतर चांगल्या वातानुकूलीत बसेस भाडेतत्त्वावर  घेऊन प्रारंभी वाहतूक सेवा सुरू करता येईल असे ते म्हणाले.