होमपेज › Nashik › दहावीत कमी गुण; विद्यार्थिनीची आत्महत्या

दहावीत कमी गुण; विद्यार्थिनीची आत्महत्या

Published On: Jun 09 2018 1:35AM | Last Updated: Jun 08 2018 11:58PMपंचवटी : वार्ताहर 

दहावी परीक्षेत कमी गुण मिळाल्याने निराश झालेल्या विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना पेठ रोडवरील फुलेनगर येथे शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली.

शुक्रवारी (दि.8) दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वत्र हर्ष उल्हासाचे वातावरण होते. मात्र, याचवेळी पंचवटीतील स्वामी विवेकानंद विद्यालयातील विद्यार्थिनी साक्षी एकनाथ बेंडकुळे (16, रा. घर नं. 877, गल्ली नं.3, फुलेनगर पोलीस चौकी पाठीमागे, पेठ रोड) हिला परीक्षेत 56 टक्के गुणमिळाल्याने तीने नैराश्यातून गळफास लावून आत्महत्या केली. 

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस हवालदार आर. आर. साळवे करीत आहेत.