Sat, Nov 17, 2018 02:36होमपेज › Nashik › जळगाव : ७ जणांचा बळी घेणारा बिबट्या ठार

जळगाव : ७ जणांचा बळी घेणारा बिबट्या ठार

Published On: Dec 10 2017 8:08AM | Last Updated: Dec 10 2017 8:08AM

बुकमार्क करा

जळगाव : प्रतिनिधी

चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे भागात नरभक्षक बिबटयाला ठार करण्यात आले. या बिबटयाने आतापर्यंत सात जणांचा बळी घेतला होता. वनविभागाने ही कारवाई केली.  हैदराबाद येथील शार्पशूटर नवाब खान यांनी बिबटयाला  रात्री १० च्या सुमारास शुट केले. 

चाळीसगाव तालुक्यातील संपूर्ण परिसरात गेल्या जुलै महिन्यापासून  बिबट्याचे सतत हल्ले होत होते. या हल्ल्यात आतापर्यंत ४ महिला, ३ बालक आणि १२ जनावरांचा बळी गेला होता. चाळीसगाव तालुक्यातील परिसरातील वरखेडे, उंबरखेड व देशमुखवाडी परिसरात हा उपद्रव सुरू होता. बिबट्याला ठार केल्यामुळे नवाब खान यांचे नागरिकांनी आभार मानले आहेत. आ. उन्मेष पाटील व तहसीलदार देवरे यांनी सर्व वन कर्मचारी यांचे कौतुक केले. 

वरखेडे खुर्दच्या खडका भागात दुपारी चार वाजल्‍यापासून नवाब शहापत आली खान व त्यांची टीम बिबट्याच्या मागावर होती. जवळपास चार ते साडेचार तास बिबट्या त्यांना सातत्याने चकवा देत होता. अखेरीस रात्री १०.२७ मिनिटांनी नवाब शहापत अली खान यांच्या बंदुकीतून सुटलेल्या गोळीने सात मानवी बळी घेणाऱ्या बिबट्याचा गेम वाजला. बिबट्याने अनेक जनावरांसह भटकी कुत्री आणि रानडुकारांवरही ताव मारला होता. गेल्या चार महिन्यापासून बिबट्याने तालुक्याच्या विविध भागात उच्छांद मांडला होता.

‘प्रशासनाने टीका व शेरेबाजीकडे दुर्लक्ष करुन आपल्या लक्ष्याकडे ध्यान केंद्रित केल्याने नरभक्षक बिबट्याला ठार करता आले. नवाब शहापत अली खान हे खासगी शुटर्स असून, त्यांचा मुलगा व नक्षबंधु यांच्या टीमचे हे यश आहे. आता बिबट्याला चाळीसगावी आणले जाणार आहे. त्याचे शवविच्छेदन करुन वरिष्ठांच्या आदेशान्वये पुढील दिशा ठरवली जाईल. त्यानंतर बिबट्या नरभक्षक का झाला ? याचा अहवाल तयार करण्यात येईल.’ अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. A