होमपेज › Nashik › नाशिक : कालव्यात शिरलेल्या बिबट्याला पकडण्यात यश (Video)

नाशिक : कालव्यात शिरलेल्या बिबट्याला पकडण्यात यश (Video)

Published On: Apr 06 2018 10:53AM | Last Updated: Apr 06 2018 10:47AMचांदवड : सुनील थोरे 

चांदवड तालुक्यातील कालव्याच्या मोरीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यात यश आले आहे. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पिंजरा लावून बिबट्याला पकडले.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, चांदवड तालुक्यातील साळसाने निंबाळे शिवारातील पुणेगावच्या डाव्या कालव्याच्या मोरीत बिबट्या शिरला होता. याची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पिंजरा लावून बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न केले. वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्याला पकडण्यात यश आले. यासाठी वनविभागाचे कर्मचाऱ्यांना स्थानिकांनी मदत केली. 

Tags : Leopard, wild animal, Caught, Forest, Nashik