Sun, Jul 21, 2019 10:19होमपेज › Nashik › लासलगाव खरेदी-विक्री संघावर प्रगती पॅनलचा निर्विवाद झेंडा

लासलगाव खरेदी-विक्री संघावर प्रगती पॅनलचा निर्विवाद झेंडा

Published On: Mar 06 2018 1:54AM | Last Updated: Mar 06 2018 1:47AMलासलगाव  : वार्ताहर

लासलगाव   सहकारी खरेदी-विक्री संघाच्या  11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांच्या  प्रगती पॅनलने सर्व जागांवर विजय मिळवला आहे. संचालक मंडळांच्या 10 जागांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. त्यामुळे पॅनलच्या विजयी उमेदवारांची संख्या  17 झाली आहे. निकालात प्रकाश कापडी 2 हजार 885 मतांनी विजयी झाले.

शंकरराव कुटे  2 हजार 831, अनिल घोटेकर  2874, जनार्दन जगताप  2813, शिवाजी जाधव  2789, दत्तात्रय डुकरे  2889, मधुकर  दरेकर  2922, नानासाहेब पाटील  2908, लक्ष्मणराव  बडवर  2774, सुरेश  रायते  2854, अनिल शिंदे  2691 मते मिळून विजयी झाले आहे. तसेच, नितीन केदार  घोटेकर, स्री राखीव मतदारसंघात निर्मला राजाराम मेमाणे, मुराबाई राजाराम दरेकर तर इतर मागास प्रवर्गात किशोर भास्करराव दरेकर, भटक्या विमुक्त जाती जमाती  मतदारसंघात शांताराम संपत नागरे, अनुसूचित जाती जमाती गटात धोंडीराम त्र्यंबक धाकराव हे सहा उमेदवार  बिनविरोध  निवडून आले होते.