Thu, Apr 18, 2019 16:02होमपेज › Nashik › कांद्याचे दर तीन दिवसांत साडेबाराशे रुपयांनी घटले

कांद्याचे दर तीन दिवसांत साडेबाराशे रुपयांनी घटले

Published On: Dec 05 2017 1:46AM | Last Updated: Dec 04 2017 10:59PM

बुकमार्क करा

लासलगाव ः वार्ताहर

सलग दोन दिवस सुट्या असल्याने लासलगाव बाजार समितीत आज लिलावात कांद्याची आवक वाढली होती. त्यामूळे कांदा दरात दोनशे रुपये प्रतिक्िंवटलने सरासरी घट झाली होती. कांदा दरात तीन दिवसांत क्िंवटलमागे सुमारे 1250 रुपयांची घट झाल्याचे चित्र होते. शुक्रवारी लिलाव बंद झाले तेव्हा लाल कांद्याला सरासरी 2451 रुपये प्रतिक्िंवटलचा भाव होता. आज त्यात पुन्हा 200 रुपये क्िंवटलने भाव घसरले. गेल्या आठ दिवसांचा विचार केल्यास कांदा भावात घसरण सुरू असून, तीन दिवसांत तब्बल 1250 रुपयांनी कांद्याच्या भावात घसरण झाली आहे.

देशभरातील किरकोळ बाजारपेठांमध्ये चढ्या भावाची स्थिती कायम होती. कांद्याचे आगार असलेल्या नाशिक जिल्ह्यात कांद्याचे भाव घसरत आहेत. कोट्यवधी रुपयांच्या दणक्यामुळे शेतकर्‍यांचा आक्रोश वाढला आहे. शहरी भागात गेल्या दीड महिन्यांपासून कांद्याचे दर वाढलेले असल्याने केंद्र सरकारने शहरी ग्राहकाला खूश करण्यासाठी निर्यातमूल्य वाढीचे अस्त्र उगारले. केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या निर्देशानुसार कांदा आयातीच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. एमएमटीसीफ दोन टप्प्यांत हा कांदा आयात करणार आहे.

नाफेडला दहा हजार टन कांदा खरेदीचे आदेश दिले आहेत. स्मॉल फार्मर्स अ‍ॅग्री बिझनेस कर्न्सोटियममलाही (एसएफएसी) सरकारने तातडीने दोन हजार टन कांदा खरेदी करण्यास सांगितले आहे. शासनाच्या अघोषित निर्यातबंदी आणि कांदा आयातीच्या निर्णयामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत.  शेतकर्‍यांच्या कांद्याला कमी भाव मिळत आहे, तर ग्राहकांना जादा दराने कांदा विकत घ्यावा लागत आहे. आज येथील मुख्य बाजार सामितीत 1350 वाहनांची आवक झाली. लाल कांद्याला कमीत कमी 1900, जास्तीत जास्त 3060, तर सरासरी 2351 रुपये प्रतिक्िंवटल भाव मिळाला.