Thu, Jun 27, 2019 16:05होमपेज › Nashik › जळगाव : वाळूमाफियाकडून प्रांताधिकाऱ्यांच्या घरावर दगडफेक

जळगाव : वाळूमाफियाकडून प्रांताधिकाऱ्यांच्या घरावर दगडफेक

Published On: May 12 2018 5:35PM | Last Updated: May 12 2018 5:35PMजळगाव : पुढारी ऑनलाईन

 पाचोरा उपविभागाचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील यांनी पदभार स्वीकारल्यापासून अवैधरित्या गौण खनिज वाहतूक करणार्‍या कडून लाखो रुपये दंड वसूल केला आहे. त्यांनी पाचोरा व भडगाव तालुक्यातील वाळू माफियांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांनी केलेल्या धडक कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. अशातच एका वाळू माफियाने प्रांताधिकाराच्या घरावर दगडफेक केल्याचा प्रकार समोर आला आहे.     

वाळूचा टॅक्टर पकडल्याने उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील यांच्या भडगांव रोडवरील त्यांचे निवासस्थानाच्या मागील बाजूस मोटारसायकलवरून येवून एका वाळू माफियाने घरावर दगडफेक केली. याने घराच्या खिडकीच्या काचा फोडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यामुळे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे. उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांच्या सारख्या कर्तव्य दक्ष अधिकारी व त्यांच्या कुटुंबीयांनावर झालेल्या प्रातघातक हल्ह्यामुळे पाचोरा तालुक्यातील विविध सामाजिक संघटना राजकिय पक्षाचे पदाधिकारी व जिल्हाभरातून निषेध केला जात आहे.

उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील यांनी गेल्या जुन महिन्यात उपविभागीय अधिकारी पदाचा पदभार स्वीकारल्या नंतर गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार यांच्यासह अनेक उपक्रमांसाठी गावा गावात कॅम्प लावून दाखले वाटप करत आहेत. पाणी टंचाईची समस्या लक्षात घेवून नदिपात्रातुन अवैध वाळू उपस्याला आळा घालण्यासाठी अनेक दिवसापासुन कारवाईचा बळगाव उगारला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून वाळूचोरी रोखण्याचा प्रयत्न चालविला आहे, यातून शासनाला लाखो रुपयाचा दंड वसूल करुन शासनाला फायदा करून दिला आहे.अवैध वाळूचा व्यवसायक करणार्‍याचे दाबे दणाणल्याने दि.12 च्या रात्री पावणे दोन वाजेच्या सुमारास  मोटरसायकल वर येऊन बंगल्याच्या मागील बाजूस उभे राहून उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील यांना अश्‍लिल भाषेत शिवीगाळ करत खिडकीवर दगड फिरकाऊन खिडकीचा काच फोडल्याने कचरे पाटील यांनी तात्काळ पोलिस उप अधिक्षक केशव पातोंड व पोलिस निरीक्षक शामकांत सोमवंशी यांचेशी भ्रमणध्वनी द्वारे संपर्क केल्याने पोलिस उपनिरीक्षक पंकज शिंदे हे काही कर्मचार्यांसह घटनास्थळी पोहोचल्या नंतर संशयीत रित्या फिरत असणार्‍या व्यक्तीस ताब्यात घेतले. 

सकाळी 9 वाजेच्या दरम्यान संशयीतरित्या फिरणारे व्यक्तीच्या शारिरीक दृष्ट्या मिळती- जुळती व्यक्ती नरेंद्र ऊर्फ पिंटु अरुण पाटील हे नाव लक्षात आल्याने कचरे पाटील यांनी त्याचे विरोधात पाचोरा पोलिसात फिर्याद दाखल केली. यावेळी तहसीलदार बी. ए. कापसे, मंडळ अधिकारी विनोद कुमावत, तलाठी आर.डी. पाटील, वाहन चालक राजु माळी, अव्वल कारकून डी.एस. सुरवाडे, भा.ज.पा.चे निरज मुणोत, हजर होते.उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील यांच्या सारख्या कर्तव्य दक्ष अधिकार्‍यावर रात्री अपरात्री प्राण घातक हल्ला झाल्याने पाचोरा येथील अधिकारी संघटना, मंडळ अधिकारी संघटना, तलाठी संघटना, एकलव्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधाकर वाघ, यांचेसह विविध सामाजिक, राजकीय संघटनांकडून जाहिर निषेध नोंदविला गेला आहे.