Wed, Sep 19, 2018 10:58होमपेज › Nashik › नाशिक जिल्हा बँक अध्यक्षपदी केदा आहेर 

नाशिक जिल्हा बँक अध्यक्षपदी केदा आहेर 

Published On: Dec 24 2017 1:45AM | Last Updated: Dec 24 2017 1:45AM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

जिल्ह्यातील शेतकर्‍यांची अर्थवाहिनी असलेल्या आणि सध्या विविध संकटांचा सामना करणार्‍या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी भाजपाचे केदा आहेर यांची बिनविरोध निवड झाली आहे. 

बँकेच्या सभागृहात सकाळी अकराला कामकाजाला सुरुवात झाली. सर्वात आधी ज्येष्ठ संचालक माणिक कोकाटे, केदा आहेर आणि दिलीप बनकर एकत्रच एका वाहनातून बँकेत दाखल झाले. त्यांच्या पाठोपाठ अन्य संचालकांचीही वाहने बँकेत आली. अध्यक्षपदासाठी कोकाटे आणि परवेझ कोकणी यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. पण, कोकणी यांचा पत्ता ऐनवेळी कट होऊन कोकाटे आणि आहेर यांच्यापैकी एकाचे नाव निवडण्याचा निरोप संचालकांना मिळाला. त्यामुळे बहुतांश संचालकांचे मत आहेर यांच्या बाजूने होते. त्यामुळे अध्यक्षपदासाठी आहेर यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी नीळकंठ करे यांनी साडेअकराला आहेर यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.