Thu, Nov 15, 2018 20:04होमपेज › Nashik › जीप-कारच्या धडकेत म्हसरूळला आठ जखमी

जीप-कारच्या धडकेत म्हसरूळला आठ जखमी

Published On: Jan 28 2018 1:33AM | Last Updated: Jan 27 2018 10:55PMम्हसरूळ : वार्ताहर

खासगी प्रवासी वाहतूक करणारी जीप व कार यांच्यात धडक होऊन सुमारे आठ जण जखमी झाले आहेत. दिंडोरी रोडवरील वडांची झाडे परिसरात शनिवारी (दि.27) दुपारी झालेल्या या अपघातातील दोघांची प्रकृती गंभीर आहे.

काळी-पिवळी जीप (एमएच 17 टी 6449) नाशिकहून वणीकडे चालली होती. त्याचवेळी पुण्यातील एका कुटुंबाची कार (एमएच 12 एचझेड 5668) नाशिककडे येत असताना त्यांच्यात धडक झाली. यात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. जीपमधील सुमारे आठ जण जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. त्यातील चालकासह गर्भवती महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. कारमधील चालक व महिला सुखरूप आहेत.