Wed, Apr 24, 2019 19:58होमपेज › Nashik › 'स्त्री शक्तीपिठ पुरस्कार' वितरण सोहळा उत्साहात संपन्न

'स्त्री शक्तीपिठ पुरस्कार' वितरण सोहळा उत्साहात संपन्न

Published On: Mar 08 2018 3:57PM | Last Updated: Mar 08 2018 3:57PMजळगाव प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, बी.एम.फाऊडेंशन व नजर फाऊडेंशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिना निमित्त दि.८ मार्च रोजी अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी आवार, जळगाव येथे स्त्री शक्तीपिठ" पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिलांच्या सक्षमीकरणासाठी उल्‍लेखनिय कामगिरी करणाऱ्या महिलांचा मान्यवरांच्या हस्‍ते सन्मान करण्यात आला.

या सोहळ्याची सुरूवात मान्यवरांच्या हस्‍ते दीपप्रज्वलनाने झाली. जळगाव लोकसभेचे शिवसेना सहसंपर्क प्रमुख मा.आमदार तात्यासाहेब आर ओ पाटील, जिल्हाधिकारी किशोरराजे निबांळकर,जिल्हा पोलिस अधिक्षक दत्तात्रय कराळे,जि.प.अध्यक्ष सौ.उज्वलाताई पाटील,स्त्री रोगतज्ञ डॉ.वर्षा लहाडे,पाचोरा न. प. च्या माजी नगर अध्यक्षा सौ सुनीता पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी सौ.कमलापुरकर, जि.प.समाजकल्याण अधिकारी सौ.वंदना राठोड,रमाई हॉस्पीटल च्या संचालीका अंजली बाविस्कर या प्रमुख उपस्‍थित होत्‍या.

महिला सशक्तीकरण व सबलीकरणासाठी काम करणार्‍या महिलांकडून "स्त्री शक्तीपीठ" पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते. या प्रस्‍तावातुन निवड समितीने जागतिक महिला दिना निमित्त जिल्ह्यातील 48 महिलाना "स्त्री शक्तीपीठ" पुरस्कार देवुन यावेळी त्‍यांना सन्मानीत करण्यात आले.

कार्यक्रमाच्या मुख्य समन्वयीका सौ.मिनल केदार,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा, संजय सुर्यवंशी, मुकेश सोनवणे,अनिल अडकमोल, अॅड.राजेश झाल्टे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रविण सपकाळे,बी.एम.चे संस्थापक योगेश नन्नवरे, बी.एम.फाऊडेंशन चे अध्यक्ष सौ.शुभांगीताई बिर्हाडे, नजर फाऊडेंशन चे सचिव दिपक सपकाळे,प्रसिध्दी प्रमुख संतोष ढिवरे  जळगाव जिल्ह्यातील सामाजीक,राजकीय,शैक्षणीक,उद्योग, सांस्कृतीक क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग होता.