Fri, Jul 19, 2019 07:25होमपेज › Nashik › जळगावच्या तरूणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू

जळगावच्या तरूणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू

Published On: Aug 29 2018 10:28PM | Last Updated: Aug 29 2018 10:27PMजळगाव : प्रतिनिधी

पंढरपूर येथील चंद्रभागा नदीत बुडून जळगावच्या तरूणाचा मृत्‍यू झाला आहे. राहुल रवींद्र काथार (वय, 32) असे मृत युवकाचे नाव आहे. बुधवारी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. 

याबाबत अधिक माहिती अशी की, नितीन दत्तू कुंवर (वय-23, रा. कासमवाडी), राजेश अशोक सोनार (वय, 19), भरत ऊर्फ सनी रवींद्र काथार (वय, 28) आणि राहुल काथार हे चौघे युवक जळगावहून पंढरपुरला गेले होते. चंद्रभागा नदीत उजनी धरणातून पाणी सोडण्यात आल्याने नदी दुथडी भरून वाहत आहे. हे सर्व जण आंघोळीसाठी नदीत उतरले होते. यातील राहूल याला पाण्याचा अंदाज न आल्याने त्‍याचा पाय घसरून तो पाण्यात बुडाला. राहुल पाण्यात बुडत असल्‍याचे पाहून सोबत असलेल्या तिघांनी देखील पाण्यात उड्या मारल्या. तोपर्यंत राहूल काथार हा दुरपर्यंत वाहत गेला होता. 

नाव्हाड्याने वाचविले तिघांचे प्राण
पाण्‍याचा अंदाज न आल्याने तिघे बुचकंडी घ्यायला लागले होते. यावेळी यातील सागर सोनारने वाचवा वाचवा असा आवाज दिल्यानंतर जवळच असलेल्‍या नाव्हाड्याने आपली नाव घेवून तिघांना वाचविले. मात्र, तोपर्यंत राहुल काथार पाण्‍यात बुडाला होता. सागर सोनारने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. मात्र, पोलिसांनी त्‍यांना कुठल्याही प्रकारे मदत केली नाही.

जिल्हाधिकाऱ्यांनी साधला संवाद
जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार यांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ जिल्हाधिकारी निंबाळकर यांच्याशी संपर्क करून त्यांना घटनेची माहिती दिली. जिल्हाधिकारी यांनी पंढरपूर येथील संस्थेशी संपर्क करून तिघां तरूणांना मदत करण्याचे आवाहन केल्यानंतर पंढरपूर संस्थेने पुढाकार घेवून मयताच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून शववाहिकेने दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास पंढरपूरहून जळगावसाठी रवाना झाले.