होमपेज › Nashik › अपात्र नेते उच्च स्थानी

अपात्र नेते उच्च स्थानी

Published On: Feb 05 2018 2:01AM | Last Updated: Feb 05 2018 12:41AM



जळगाव  : प्रतिनिधी

संपूर्ण राज्य एकत्रित करून भारत देश निर्माण केला ते महान नेते सरदार वल्लभभाई पटेल यांची पंतप्रधान होण्याची पात्रता असूनही पंतप्रधान होऊ शकले नाहीत. तर ज्यांची पात्रता नाही असे लोक आज राजकारणात महत्त्वाच्या पदावर आहेत. तर पात्रता असणारे बाहेर असल्याची टीका माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केली. त्यांचे हे वक्‍तव्य स्वकियांचा समाचार घेणारे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पाडळसे (ता. यावल) येथे भोरगाव लेवा पंचायतीच्या वतीने पाडळसे येथे आयोजित लेवा पाटील समाजाच्या राष्ट्रीय महाअधिवेशनात ते बोलत होते. यावेळी रमेश पाटील, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, महापौर ललित कोल्हे, डॉ. ए. जी. भंगाळे उपस्थित होते.

आ. खडसे म्हणाले, पूर्वीची व आजची परिस्थिती फार काही वेगळी नाही. लेवा पाटीदार समाजाचे नेते सरदार वल्लभभाई पटेल यांच्यात भारताचे पंतप्रधान बनण्याचे गुण असताना ते त्या पदावर विराजमान होऊ शकले नाहीत. त्यांना राजकारणाच्या प्रवाहातून बाहेर करण्यात आले. संपूर्ण भारत एकत्र करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली तरीदेखील त्यांना पंतप्रधान होता आले नाही. मात्र, सध्या केवळ सोयीचे राजकारण सुरू आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.