Mon, Apr 22, 2019 15:39होमपेज › Nashik › जळगाव : सहाय्यक अभियंत्याला लाच घेताना अटक 

जळगाव : सहाय्यक अभियंत्याला लाच घेताना अटक 

Published On: Apr 27 2018 4:26PM | Last Updated: Apr 27 2018 4:26PMजळगाव : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी लिमिटेडचा सहाय्यक अभियंत्‍याला नविन विज कनेक्शनसाठी 10 हजार रूपयांची लाच घेतांना जळगाव लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले. यामुळे महाराष्‍ट्र राज्‍य वीज वितरण कंपनीच्या कर्मचार्‍यांमध्ये  एकच खळबळ उडाली. याप्रकरणी सहाय्यक अभियंता याच्या घराची झडती सुध्दा घेण्यात आली.

भुसावळ येथील तक्रारदार यांच्या मालकीची शेती थोरगव्हाण हद्दीत शेती आहे. शेतीसाठी लागणार्‍या वीज कनेक्शनसाठी तक्रारदार याने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडकडे रितसर अर्ज दाखल केला होता. मात्र शेतात कनेक्शन देण्यासाठी मराविविकंलिचे सहाय्यक अभियंता वर्ग -2 राकेश लक्ष्मण भंगाळे (35 रा.डी.एन.कॉलेज समोर,फैजपुर) याने तक्रारदाराला कनेक्शनसाठी 10 हजार रूपयांची लाच मागितली. याप्रकरणी तक्रारदार याने जळगाव लाच लुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली असता, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपविभागीय अधिकारी जी.एम ठाकुर व त्याच्या सहकार्यांनी आज तात्काळ सावदा येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात दुपारी 2 वाजेच्या सुमारास सापळा लावला असता, त्यावेळी राकेश लक्ष्मण भंगाळे (वय-35),सहाय्यक यंता,म.रा.वि.वि.कं.लि.याला 10हजाराची लाच घेतांना रंगेहाथ अटक केली. याप्रकरणी सावदा पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याचबरोबर सहाय्यक अभियंता राकेश भंगाळे यांच्या घराची झडती घेण्यात आली 

सरकार व कृषी खाते शेतकर्‍यांना विज कनेक्शन तात्काळ द्यावे असे म्हणत असतांना विज वितरण कंपनीचे अधिकारी अशी शेतकर्‍यांना पैश्याची मागणी करत असतील तर शेतकर्‍यांनी काय करावे असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. केळी लागवडीचा सिझन सुरू झाला आहे. त्यात विज वितरण कंपनी शेतकर्‍याच्या मागणीकडे दुर्लक्ष करून कनेक्शनसाठी लाचेची मागणी करित आहे.अशी चर्चा शेतकर्‍यामध्ये रंगली होती.