Sun, Oct 20, 2019 01:44होमपेज › Nashik › जळगाव : एसटीची कारला धडक, दोन ठार

जळगाव : एसटीची कारला धडक, दोन ठार

Published On: Jul 12 2019 2:59PM | Last Updated: Jul 12 2019 3:03PM
जळगाव : प्रतिनिधी

काकणबर्डी ते ओझर दरम्यान एरंडोलकडे जाणारी बस व एरंडोल येथून पिंपळगाव हरेश्वर येथे आषाढी यात्रेला जात असलेल्या मराठे, पाटील कुटूंबाच्या कारला झालेल्या अपघातात दोन ठार झाले, तर 8 जण जखमी झाले. जखमींमध्ये बसमधील काही प्रवाशांचाही समावेश आहे.

मराठे व पाटील परीवार हा एरंडोल, धरणगाव येथील असल्याने आज आषाढी एकादशीनिमित्त पिंपळगाव येथे प्रती पंढरपूर येथे दर्शनासाठी जात होते. पाचोराकडून एरंडोलकडे जाणारी बस क्रमाक एम एच. 20 डी. 9538 तर एरंडोल येथून पिंपळगाव हरेश्वर येथे आषाढी यात्रेला जात असलेल्या मराठे, पाटील कुटूंबाच्या कारला येणार्‍या बसने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात कारमधील आठ वर्षीय बालिका परी मराठे व कार चालक बापू रघुनाथ मराठे (पाटील, वय- 48) हे जागीच ठार झाले. 

गंभीर जखमींमध्ये सरला मराठे (वय-36), गौरव मराठे (वय-18), मयुरी पाटील (वय-16), रेखा पाटील (वय-36), ओम पाटील (वय-5) यांचा समावेश आहे. यामुळे एरंडोलवर शोककळा पसरली आहे. स्थानिक नागरिकांनी जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले.