कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाकडून विद्यार्थ्याचे परीक्षा शुल्क माफ

Last Updated: Nov 10 2019 1:38AM
Responsive image


जळगाव : प्रतिनिधी 

परतीच्या पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ओल्‍या दुष्‍काळामुळे शेतकरी चिंतेत आहे. अशा परिस्‍थितीत शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणाचे परीक्षा शुल्‍क भरण्यात अडचणी येणार आहेत. त्‍यामुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होवू नये यासाठी आज (ता.9) रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने सामाजिक बांधिलकीच्या नात्याने महत्वाचा निर्णय घेतला.

यामध्ये अतिवृष्टी आणि ओला दुष्काळ लक्षात घेऊन विद्यापीठ परिक्षेत्रातील सर्व महाविद्यालये/परिसंस्थांमधील आणि विद्यापीठ प्रशाळांमधील सरसकट सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. अंदाजे पावणे दोन लाख विद्यार्थ्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज व्यवस्थापन परिषदेची बैठक झाली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, युवा सेना, दर्जी फाऊंडेशन आणि विद्यापीठ विकास मंच या संघटनांकडून अतिवृष्टीची परिस्थिती लक्षात घेता विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात यावे ही अशी मागणी विद्यापीठाकडे करण्यात आली होती. या बैठकीत या संघटनांच्या निवेदनावर सविस्तर चर्चा झाली. अवकाळी पावसाने शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले असून हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून नेला आहे. 

विद्यापीठ परिक्षेत्रातील विद्यार्थ्यांचे बहुसंख्य पाल्य शेतकरी आहेत. अशा परिस्थितीत सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याबाबत निर्णय घेण्यात यावा अशी भूमिका दिलीप पाटील यांनी मांडली. प्राचार्य एल.पी.देशमुख, दीपक पाटील, प्रा.नितीन बारी व इतर सदस्यांनी याबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या. सामाजिक बांधिलकीच्या नात्याने विद्यापीठाने वेळोवेळी पुढाकार घेतला आहे. आता खान्देशात अतिवृष्टीचे संकट लक्षात घेऊन सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करावे, असे मत व्यक्त झाले.  

चर्चेअंती परिक्षेत्रातील संलग्नित सर्व महाविद्यालये/परिसंस्थां मधील आणि विद्यापीठ प्रशाळांमधील सरसकट सर्व विद्यार्थ्यांचे मार्च-एप्रिल/मे, 2020 मध्ये होणार्‍या परीक्षांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांची ही संख्या अंदाजे 1 लाख 75 हजार एवढी आहे. सामाजिक बांधिलकीच्या नात्याने परीक्षांच्या कामाचे मानधन प्राध्यापकांनी घेऊ नये, असे आवाहन प्राध्यापकांच्या दोन्ही संघटनांना व्यवस्थापन परिषद सदस्यांच्यावतीने करण्याचेही या बैठकीत ठरले.

या बैठकीस प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहुलीकर, दिलीप पाटील, प्रा.रत्नमाला बेंद्रे, प्राचार्य एल.पी.देशमुख, प्रा.नितीन बारी, दीपक पाटील, विवेक लोहार, डॉ.जे.बी.नाईक, डॉ.प्रिती अग्रवाल,तंत्रशिक्षणचे प्रभारी संचालक बी.पी.नाथे, कुलसचिव भ.भा.पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी.पाटील आदी उपस्थित होते.









अखेर ठरलं! ठाकरे घराण्यातील पहिला मुख्यमंत्री होणार; उद्धव ठाकरेंनी प्रस्ताव स्वीकारला


 'तो' कॅच घेतला रोहित शर्माने, पण सोशल मीडियावर हवा संजय राऊतांची! 


खांदेपालट श्रीलंकेत, पण भारताच्या कपाळावर का चिंतेच्या रेषा?


बैठकीतून बाहेर पडताच मुख्यमंत्रिपदावर उद्धव ठाकरे काय म्हणाले? 


अखेर शरद पवारांनीच दिली गोड बातमी; मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरेंच्या नावावर सर्वसंमती!


पुणे : मराठा सरदारांच्या राज्यभरातील वशंजांचे एकत्र येऊन शस्त्रसंपदेचे प्रदर्शन! (video)


बांगला देशने खेळवले १२ फलंदाज 


'अशी' कामगिरी करणारा इशांत शर्मा ठरला पहिला भारतीय गोलंदाज!


सांगली : पोटच्या पोरानं ठोकरलं, नंतर पोरीनंही दार लाऊन घेतलं; आईनं बसस्थानकात काढली रात्र!


संजय राऊतांच्या तिखट शेरो शायरीनंतर आता नवाब मलिकांचाही 'शायराना' अंदाज!