Fri, Feb 22, 2019 01:20होमपेज › Nashik › दिखाऊ कामांना आयुक्‍तांची कात्री

दिखाऊ कामांना आयुक्‍तांची कात्री

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

महासभेत सादर करण्यात आलेल्या अंदाजपत्रकावर सभागृहात सदस्यांसह पदाधिकार्‍यांनी सुचविलेल्या लोकानुनय योजनांना आयुक्‍तांनी कात्री लावत महसूल वाढविण्याच्या दृष्टीने येत्या काळात अनेक कठोर निर्णय घेण्यात येणार असल्याचे संकेत देत आर्थिक सुधारणांवर भर देत असल्याचे स्पष्ट केले. नवीन मिळकतींना आजपासून (दि.1) नव्याने मालमत्ता कर प्रणाली लागू करण्याबरोबरच मनपा कर्मचारी व अधिकार्‍यांच्या वेतनश्रेणीची पडताळणी करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला. 

स्थायी समितीच्या सभापती हिमगौरी आडके यांनी शनिवारी (दि.31) महासभेत 1900 कोटींचे अंदाजपत्रक सादर केले. महासभेत बहुतांश सर्वच सदस्यांनी प्रभागातील विविध विकास कामांसाठी प्रभाग विकास निधी उपलब्ध करून द्यावा, 257 कोटींच्या रस्त्यांची कामे तसेच यापूर्वी आयुक्‍तांनी रद्द केलेली कामांना मंजुरी देण्याची मागणी लावून धरली. परंतु, त्यावर आयुक्‍तांनी सहमती दर्शविण्यास स्पष्टपणे नकार देत महापालिकेचा महसूल वाढविल्याशिवाय विकास कामे कशी होणार असा प्रश्‍न उपस्थित करत महसूल वाढीसाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागले तरी ते मी घेणारच  असे ते म्हणाले.

Tags : Nashik, Nashik News, Indicate,  strict, decisions 


  •