Wed, Apr 24, 2019 12:21होमपेज › Nashik › नाशिक फिल्म फेस्टिव्हलचे उद्घाटन

नाशिक फिल्म फेस्टिव्हलचे उद्घाटन

Published On: Mar 23 2018 1:59AM | Last Updated: Mar 23 2018 1:49AMनाशिक : प्रतिनिधी

नाशिक आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलचे गुरुवारी उद्घाटन करण्यात आले. तसेच फेस्टिव्हलचे आयोजक मुकेश कणेरी यांनी उद्घाटन करतानाच हे फेस्टिव्हलचे शेवटचे वर्ष असल्याचे घोषित केले. त्याचबरोबर माजी आमदार बबन घोलप यांनी शासनाकडून आणि महापालिकेकडून निधी मिळत नसल्याने या फेस्टिव्हलचे हे शेवटचे वर्ष असल्याचे जाहीर केले.

दरम्यान, या फेस्टिव्हलच्या उद्घाटनापूर्वी चार चित्रपट दाखवण्यात आले. यात नाशिकमध्ये तयार केलेल्या नदी वाहते या चित्रपटाने फेस्टिव्हलची सुरुवात करण्यात आली. मात्र, हा चित्रपट बघण्यासाठी नाशिककर फारसे उत्सुक नसल्याचे दिसले. सभागृहात अवघे बोटावर मोजण्याइतकेच प्रेक्षक होते. यातही उद्घाटन समारोपाला महापौर रंजना भानसी यांनीही पाठ फिरवली. कार्यक्रमला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ अभिनेत्री स्मृती विश्‍वास, वर्षा उसगावकर, सुषमा शिरोमणी, बबनराव घोलप तसेच दादासाहेब फाळके यांच्या कुटुंबीयातून चंद्रकांत पुळसकर आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, या फेस्टिव्हलमध्ये अभिनेत्री स्मृती विश्‍वास, सुषमा शिरोमणी तसेच आणखी तीन कलाकारांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. दरम्यान या फिल्म फेस्टिव्हलमध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी सोबत परदेशातील अनेक भाषांचे चित्रपट दाखवले जाणार आहेत.

Tags : Nashik, Nashik News, Inauguration, Nashik Film Festival