Thu, Sep 20, 2018 06:13होमपेज › Nashik › पाच हजारांची लाच घेताना लिपिक जाळ्यात

पाच हजारांची लाच घेताना लिपिक जाळ्यात

Published On: Jan 23 2018 1:15AM | Last Updated: Jan 22 2018 11:05PMधुळे : प्रतिनिधी

वेतनवाढीचा फरक आणि मागील पगार काढून देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना जिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ लिपिक सुरेश वना सैंदाणे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी रंगेहाथ पकडले. लाच प्रकरणी शासकीय कर्मचार्‍याला पकडण्याची चार दिवसांतील ही दुसरी घटना आहे.

यासंदर्भात तक्रारदाराने धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार या विभागाच्या अधिकार्‍यांंनी जुन्या जिल्हा रुग्णालयाच्या आवारात सापळा रचला होता. तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारताना सैंदाणे यास रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नाशिक येथील पोलीस अधीक्षक डॉ़  पंजाबराव उगले, पोलीस उपअधीक्षक शत्रुघ्न माळी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.