Thu, Jan 17, 2019 12:47होमपेज › Nashik › नाशिकचा पारा स्थिर

नाशिकचा पारा स्थिर

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

सलग दुसर्‍या दिवशी नाशिकमध्ये 12.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. पारा स्थिर असला तरी नाशिककरांना हुडहुडी भरली असून, ठिकठिकाणी शेकोट्या पेटविण्यात येत आहेत. 

गत दोन दिवसांपासून तापमानात सतत घट होत असून, रविवारी (दि. 26) नाशिकमध्ये 12.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. रात्री व पहाटेच्या सुमारास थंडीचा जोर अधिक आहे. दरम्यान, थंडीचा कडाका वाढल्याने सर्वसामान्यांचे हाल होत आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक उबदार कपड्याची मदत घेत आहेत. चौकाचौकांमध्ये तसेच गल्लीबोळांमध्ये शेकोट्या पेटविण्यात येत आहेत. 

गत आठडवड्यात ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे पारा 19 अंशांपर्यंत पोहोचला होता. मात्र, आता पार्‍यात पुन्हा घसरण होऊ लागली आहे. येत्या काही दिवसांमध्ये तपमानात लक्षणीय घट होणार असल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली आहे.