होमपेज › Nashik › जुने नाशिक येथे हिंदू तिथीनुसार शिवजयंती 

जुने नाशिक येथे हिंदू तिथीनुसार शिवजयंती 

Published On: Feb 10 2018 10:37PM | Last Updated: Feb 10 2018 10:37PMद्वारका : प्रतिनिधी

जुने नाशिक येथे तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. भोई गल्ली येथे शिवजयंती साजरी करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

शहरातील सर्व मंडळे दरवर्षी हिंदू तिथीनुसार शिवजयंती साजरी करतात. आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी पुढारी आणि नेतेमंडळी तारखेचा घोळ करत आहेत. पण त्याकडे लक्ष न देता शिवभक्तांनी फाल्गुन वद्य तृतीय या तिथीला (४  मार्च २०१८) शिवजयंती साजरी करावी असे आवाहन हिंदू एकता आणि शहरातील मंडळांच्या बैठकीत करण्यात आले.

या बैठकीस हिंदू एकताचे रामसिंग बावरी, प्रसाद बावरी, शिवेसेनाचे संदीप डहानके, महेश सोपे, राजू राठोड, बजरंग दलाचे विनोद थोरात, बीजेपीचे शाम बोरदे, तसेच प्रशांत दिवटे, दीपक देशमुख, राहुल खैरे, बाळू भोई, चंदन भास्करे, निलेश वारे, आदी प्रमुख मान्यवर व जुने नाशिक मधील सर्व मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.