Tue, Feb 19, 2019 02:56होमपेज › Nashik › बालेकिल्ल्यांवर भगवा

बालेकिल्ल्यांवर भगवा

Published On: Dec 12 2017 2:08AM | Last Updated: Dec 12 2017 1:55AM

बुकमार्क करा

इगतपुरी/त्र्यंबकेश्‍वर : वार्ताहर

जिल्हाभरात उत्सुकता लागून असलेल्या इगतपुरी व त्र्यंबकेश्‍वर नगरपालिका निवडणुकीत सत्ता राखण्यात सेना-भाजपाला यश आले आहे. इगतपुरीला सेनेने नगराध्यपदासह 18 पैकी 13 जागांवर निर्विवाद यश मिळविले. तर त्र्यंबकेश्‍वर पालिकेत नगराध्यक्षपदासह 17 पैकी 14 जागांवर भाजपाने बहुमत मिळविले. युतीने 13 नगरसेवकांसह, नगराध्यक्षपदावर यश मिळवले. काँगे्रस, बहुजन विकास आघाडीचा सुपडासाफ झाला आहे, तर भाजपाला चार जागांवर समाधान मानावे लागले. एका अपक्षानेही विजय मिळवत नगरपालिकेत प्रवेश केला आहे. त्र्यंबक पालिकेत नगराध्यक्षपदासह  नगरसेवकपदाच्या 14 जागांवर भाजपाने बहुमत मिळविले. शिवसेनेच्या वाट्याला अवघ्या दोन जागा आल्या. तर, अपक्षाला एक जागा मिळाली.