Mon, Jan 21, 2019 09:29होमपेज › Nashik › आयपीएलवर सट्टा; तिघा बुकींना अटक

आयपीएलवर सट्टा; तिघा बुकींना अटक

Published On: Apr 22 2018 1:13AM | Last Updated: Apr 22 2018 12:05AMनाशिक : प्रतिनिधी

आयपीएलच्या क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावणार्‍या तिघा सराईत बुकींना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे पाच लाखांचा मुद्देमाल जप्‍त केला आहे. गुरुप्रीतसिंग हरबनसिंग जट (रा. पंचवटी), अमित अनिल देसले (रा. ट्रॅक्टर हाउसच्या मागे, द्वारका) आणि भाजपा पदाधिकारी सतनाम दिलीपसिंग राजपूत अशी या तिघा बुकींची नावे आहेत.

गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांना मिळालेल्या माहितीनुसार तिघे संशयित बुकी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स या संघामध्ये सुरू असलेला सामना अंबड औद्योगिक वसाहतीतील हॉटेल रिग्जच्या पहिल्या मजल्यावर मोबाइलवर ऑनलाइनरीत्या पाहत होते. तसेच तेथील लोकांकडून बोली लावून सट्टा खेळताना आढळून आले. सट्ट्याची माहिती रजिस्टरवर नोंदवलेली होती. पोलिसांनी नऊ मोबाइल आणि एक स्विफ्ट कार जप्‍त केली आहे.

 

Tags : nashik, nashik news, crime, IPL betting, bookies arrested,