Tue, Nov 13, 2018 08:07होमपेज › Nashik › खडसे-भुजबळ संबंधाचा गौप्यस्फोट करणार

खडसे-भुजबळ संबंधाचा गौप्यस्फोट करणार

Published On: Apr 17 2018 1:52AM | Last Updated: Apr 17 2018 12:17AMजळगाव : प्रतिनिधी

माजी मंत्री छगन भुजबळ व माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यातील संबंध आपण येत्या तीन ते चार दिवसांत जाहीर करणार असल्याचा गौप्यस्फोट सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोमवारी (दि.16) रावेर येथे केला आहे. आ. खडसे यांची बदनामी केल्याप्रकरणी सुरू असलेल्या खटल्याच्या सुनावणीसाठी दमानिया रावेर येथे आल्या असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

दमानिया म्हणाल्या, माझ्यावर खडसे यांच्यावरील आरोपाबाबत 22 ठिकाणी खटले दाखल आहेत. मात्र, एकही खटला खडसे यांनी दाखल केलेला नाही. हे सर्व खटले कार्यकर्त्यांनी दाखल केलेले आहेत. कारण, त्यांनी जर खटला दाखल केला असता तर त्यांना आपण जेरीस आणले असते, असा दावा त्यांनी केला आहे. तसेच या खटल्याप्रकणी आपण मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, त्याबाबत संबंधितांना नोटिसादेखील पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कल्पना इनामदार यांनी भुजबळ याच्या केसमधून मागे सरण्यासाठी आपल्याला ऑफर दिल्याचाही गौप्यस्फोटही त्यांनी केला.

Tags : Nashik, filed, 22, cases, related, charges, against, Khadse