नाशिकरोड : उपनगर परिसरातील महाराष्ट्र हायस्कूलच्या मुख्याध्यापिकेवर त्यांच्या पतीनेच चाकूने हल्ला केल्याची घटना मंगळवारी (दि.27) दुपारी दीडच्या दरम्यान घडली. चारित्र्याच्या संशयावरून हल्ला झाल्याचा संशय सूत्रांनी व्यक्त केला आहे .
तारा मधुकर मोरेे (54, राहणार नेहरूनगर ) असे हल्ला झालेल्या मुख्याध्यापिकेचे नाव आहे. मुख्याध्यापिका शाळेत असतांना पती मधुकर मोरे शाळेत आले. दोघांमध्ये भांडण झाले. यावेळी रागाच्या भरात पतीने चाकूने हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्याने मुख्याध्यापिका तारा मोरे या गंभीर जखमी झाल्या. शिक्षकांनी उपनगर पोलिसांना घटनेची माहिती दिली. पतीला उपनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.