होमपेज › Nashik › नाशिक : ३४ टीईटी अनुत्तीर्ण शिक्षकांना दिलासा 

नाशिक : ३४ टीईटी अनुत्तीर्ण शिक्षकांना दिलासा 

Last Updated: Jan 22 2020 1:00PM
येवला : प्रतिनिधी

१३ फेब्रुवारी २०१३ नंतर नियुक्त शिक्षक पात्रता परिक्षा (टीईटी) उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांची सेवा समाप्तचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालक यांनी दिले होते. तसेच या शिक्षंकाची सेवा संबंधित खासगी शिक्षण संस्थानी यापुढे सुरू ठेवल्यास, त्यास १ जानेवारी २०२० पासून शासकीय वेतन अनुदान अनुज्ञेय राहणार नाही, असेही आदेश निर्गमीत केले होते. त्यामुळे राज्यातील फेब्रुवारी २०१३ नंतर नियुक्त अनेक शिक्षकांच्या नोकरीवर गंडांतर आले होते. 

अधिक वाचा : भाजपच्या चेहऱ्यावरचे मुखवटे संपता संपत नाहीत; शिवसेनेचा हल्लाबोल

शासनाच्या या आदेशाविरोधात नाशिक जिल्ह्यातील ३४ शिक्षकांनी इंदीरा गांधी शाळेचे मुख्याध्यापक अरूण नवले यांच्या मार्गदर्शनाखाली उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली. या शिक्षकांच्या वतीने अॅड. संजीव बापू देवरे यांनी न्या. धर्माधिकारी यांच्या पिठासमोर परखड आणी खंबीरपणे बाजू मांडली. अॅड. देवरे यांनी केलेल्या प्रभावी युक्तीवादामुळे मा. उच्च न्यायालयाने शिक्षकांची व शासनाची बाजू ऐकून घेऊन नाशिक जिल्ह्यातील ३४ शिक्षकांच्या याचिकेबाबत प्रशासनाला स्थगिती आदेश दिले. यामुळे नाशिक जिल्ह्यातील ३४ शिक्षकांना यामुळे दिलासा मिळाला आहे. त्यामुळे या शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. स्वप्नील कोठावदे, किरणसिंग राजपूत यांच्यासह अन्य शिक्षकांनी ही याचिका दाखल केली होती.