Thu, Jul 18, 2019 05:52होमपेज › Nashik › कोसळणाऱ्या हेलिकॉप्टरचे एमर्जन्सी लँडिंग (व्हिडिओ)

कोसळणाऱ्या हेलिकॉप्टरचे एमर्जन्सी लँडिंग (व्हिडिओ)

Published On: Jan 16 2018 4:56PM | Last Updated: Jan 16 2018 4:53PM

बुकमार्क करा
नाशिक: प्रतिनिधी

शहीद जवानाचे पार्थिव धुळे येथे पोहोचवून सोमवारी नाशिकला परत येताना हेलिकॉप्टरचा एक दरवाजा ढिला झाला. यामुळे हेलिकॉप्टर कोसळण्याची शक्यता होती. मात्र पायलटने प्रसांगावधान दखवून एका शेतात एमर्जन्सी लँडिंग केले. पाकिस्तानच्या गोळीबारात सुभेदार योगेश भदाणे शहीद झाले होते. त्यांलचे पार्थिव धुळ्याला पोहोचवून परत येत असताना बागलाण तालुक्यातील अजमेर सौंदाणे येथे ही घटना घडली. 

अचानक शेतात कमी उंचीवरून शेतात कोसळल्यासारखे हेलिकॉप्टर उतरल्याने शिवारात खळबळ माजली. साडेपाचच्या सुमारास घडलेली घटना बघण्यासाठी शेतकरी, मजुरांची गर्दी झाली. हेलिकॉप्टर सुखरूप उतरून घेत ते चालू ठेवत पायलट तेथेच बसून राहिला. आतील दोन्ही सैनिकांनी खाली उतरून निखळणारा दरवाजा खोलण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली. 

एका सैनिकाने जमावाला सुरक्षित अंतरावर उभे राहण्याचे आवाहन केले. तर दोन सैनिकांनी तब्बल वीस मिनिटे खटाटोप करून दरवाजा खोलण्यात यश मिळवले आणि खोललेला दरवाजा हेलिकॉप्टरमध्ये ठेवून घेतला. त्यानंतर एक दरवाजा नसताना हेलिकॉप्टरने पुन्हा उड्डाण केले. प्रत्यक्षदर्शींनी थरार मोबाईलमध्ये कैद केला. पोलिसांना मात्र या गोष्टीचा थांगपत्ता लागला नाही.