Sat, Nov 17, 2018 06:18होमपेज › Nashik › शेतमजूर कुटुंबावर कुर्‍हाडीने वार

शेतमजूर कुटुंबावर कुर्‍हाडीने वार

Published On: Jul 06 2018 1:33AM | Last Updated: Jul 05 2018 11:34PMजळगाव : प्रतिनिधी

एरंडोल तालुक्यातील उत्राण येथे शेतात कामाला असलेल्या कुटुंबीयांवर एकाने कुर्‍हाडीने वार करून स्वतःलाही धावत्या रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात एक ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, चाळीसगावचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव आदींनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे.

पाचोरा रस्त्यावरील उत्राण गावापासून एक कि.मी अंतरावरील राजेंद्र भागवत पाटील याच्या मालकीच्या शेतात सुकलाल रिया भिलाला (38) हा पत्नी कारू सुकलाल भिलाला (32), मुलगी सीमा भिलाला (11), मुलगा गोविंद भिलाला (7), रतन भिलाला (पावरा) यांच्यासह राहत होता. मुलगा रतन सुकलाल भिलाला गुरुवारी पहाटे पाच वाजता कंपनीतून घरी आला असता त्याला वडील सुकलाल भिलाला हे रक्‍ताच्या थोराळ्यात पडलेले दिसले. तर आई कारू भिलाला, बहीण सीमा भिलाला, भाऊ गोविंद भिलाला हे रक्‍ताच्या थोराळ्यात दिसले. याबाबत त्याने पोलिसांना व शेतमालकाला तत्काळ माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयातदाखल केले असता डॉक्टरांनी सुकालाल भिलाला यांना मृत घोषित केले. तर मयत सुकलाल भिलाला याची पत्नी कारू हिच्या डोक्याला, तर मुलगी सीमा हिच्या हनवटी व मानेवर वार झाला आहे.

तर गोविंद याच्या डोक्याच्या मध्यभागी जखम झाली आहे. सुकलाल याचे इतर दोन मुले जतन व रवींद्र दोघे गावी असल्याने बचावले आहेत. दरम्यान, पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भडगाव तालुक्यातील भातखंडे येथे कामाला असलेला संशयित ज्ञानसिंग वालसिंग पावरा हा सुकलाल भिलाला याच्या घरी बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजता आला होता. तसेच घटनास्थळावर त्याचा मोबाइलही मिळून आला आहे. मात्र, येथून काहीच अंतरावर असलेल्या रेल्वे रूळावर त्याचाही मृतदेह आढळून आल्याने त्याने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची शक्यता व्यक्‍त केली आहे.