Sun, Aug 18, 2019 20:38होमपेज › Nashik › नाशिक मविप्र मॅरेथॉनमध्ये हरियाणाचा करण सिंग विजेता

नाशिक मविप्र मॅरेथॉनमध्ये हरियाणाचा करण सिंग विजेता

Published On: Jan 07 2018 12:12PM | Last Updated: Jan 07 2018 12:06PM

बुकमार्क करा
नाशिक : प्रतिनिधी 

येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेतर्फे आयोजित पाचव्या राष्ट्रीय नाशिक मविप्र मॅरेथॉन स्पर्धेत हरियाणाच्या करण सिंग याने विजेतेपद पटकावले. पहाटेच्या कडाक्याच्या थंडीत तब्बल पाच हजारांहून अधिक धावपटूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला.  नौकानयनातील ऑलिम्पिकपटू दत्तू भोकनळ हे या स्पर्धेचे प्रमुख आकर्षण ठरले.

गंगापूर रोडवरील मॅरेथॉन चौक येथून सकाळी सहापासून मॅरेथॉन स्पर्धेला सुरवात झाली. पूर्ण व अर्ध मॅरेथॉनसह विविध गटांत ही स्पर्धा झाली. त्यात शालेय विद्यार्थ्यांसह राष्ट्रीय धावपटूंनी सहभाग नोंदवला. पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, विनीता सिंगल, मॅरेथॉन आयोजन समितीच्या अध्यक्ष व मविप्र संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार, अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, सभापती माणिकराव बोरस्ते, उपसभापती राघोजी अहिरे यांच्यासह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. 

स्पर्धेच्या 42 किमीच्या पूर्ण मॅरेथॉन गटात महाराष्ट्राचा धावपटू किशोर गव्हाणे याने दुसरा क्रमांक पटकावला. तर पुण्याचा अभिमन्यू कुमार तिसऱ्या क्रमांकावर राहिला.