Mon, Aug 26, 2019 02:21होमपेज › Nashik › नाशिक : वर्गात विद्यार्थिनीशी छेडछाड, शिक्षकावर गुन्हा (व्हिडिओ)

नाशिक : वर्गात विद्यार्थिनीशी छेडछाड, शिक्षकावर गुन्हा(व्हिडिओ)

Published On: Jun 01 2018 3:26PM | Last Updated: Jun 01 2018 9:20PMनाशिक (इंदिरानगर)  

नाशिकमधील राणेनगरमध्ये असलेल्या सेंट फ्रान्सिस स्कुलमधील शिक्षकाने गुरुच्या नावाला काळीमा फासणारा प्रकार केल्याचे उघडकीस आले आहे. नववीच्या वर्गातील अल्पवयीन विद्यार्थीनीला छेडछाड केल्याप्रकरणी सुनिल कदम नावाच्या शिक्षकाविरोधात पीडित विद्यार्थीनीच्या कुटुंबियांनी तक्रार दाखल केली आहे. हा शिक्षक आपल्या वर्गातील विद्यार्थीनीसमोर प्रेम व्यक्त करत तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता. एवढेच नाही तर  तिच्या मोबाईलवर संदेश देखील पाठवायचा. शिक्षकाच्या या कृतीमुळे विद्यार्थीनी प्रचंड तणावाखाली होती. रडत घरी आल्यानंतर आईने मुलीला विश्वासात घेतल्यानंतर  तिने सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. 

नापास करण्याची भीती दाखवत शिक्षक मधल्या सुट्टीत  जवळीक साधण्याचा प्रयत्न करतो. तसेच तू घरी काही सांगितलेस तर मी तुला  बघून घेईल या प्रकारची धमकी देत असल्याचे मुलीने आपल्या आईला सांगितले. याप्रकरणी मुलीच्या आईने  इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून संबंधित शिक्षकाविरोधात  पोस्को कलम १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  महिला उप निरिक्षक श्वेता बेलेकर या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.