Sat, Jul 20, 2019 08:39होमपेज › Nashik › धान्य घोटाळ्यातील ३५ किलो पुरावे न्यायालयात

धान्य घोटाळ्यातील ३५ किलो पुरावे न्यायालयात

Published On: Feb 28 2018 1:13AM | Last Updated: Feb 28 2018 12:16AMनाशिक :

वाडिवर्‍हे शासकीय धान्य घोटाळ्याप्रकरणी 35 किलो वजनाचा बॉक्स न्यायालयात पाठवण्यात आला असून त्यात घोटाळ्यासंबंधी पुरावे आहेत. नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नावाने आलेल्या या बॉक्समध्ये धान्य घोटाळ्यातील बिले, चलने असा दस्तऐवज असल्याचे समजते. शासकीय धान्य घोटाळ्याप्रकरणी 14 संशयितांविरोधात मोक्कान्वये गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी तपास सुरु असतानाच काही दिवसांपूर्वी धान्य घोटाळ्याशी संबंधित 35 किलो वजनाचा बॉक्स नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नावाने कुरियरमार्फत आला.

या बॉक्समध्ये घोटाळ्यातील एक संशयित लखन पटेल याच्या जय आनंद मीलशी संबंधित ही बिले आहेत. तर धान्याची वाहतूक करणारे ठेकेदार मोरारजी भिकूलाल मंत्री व व्यवस्थापक संजय गडाख याच्या ट्रान्सपोर्टची चलने, बिले यामध्ये आहेत. ठाण्यातून हे कुरियर आले असून सर्व कागदपत्रे, बिले, चलने ही मुळ स्वरुपातील आहेत.