Thu, Jul 18, 2019 10:27होमपेज › Nashik › युती सरकारने जनतेची फसवणूक केली

युती सरकारने जनतेची फसवणूक केली

Published On: Apr 15 2018 1:28AM | Last Updated: Apr 14 2018 11:09PMसिन्‍नर : प्रतिनिधी

जनतेला ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवत दिशाभूल करून सत्ता हस्तगत करणार्‍या भाजपा-शिवसेना युती शासनाचा सिन्‍नर तालुका काँग्रेस कमिटीच्या बैठकीत निषेध करण्यात आला. शासनाच्या आडमुठे धोरणामुळे गेल्या साडेतीन-चार वर्षांत देशात सर्वाधिक शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. आत्महत्येस जबाबदार असलेल्या सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी बैठकीत करण्यात आली. 

सिन्नर तालुका काँग्रेस कमिटीची बैठक तालुकाध्यक्ष विनायक सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. युती शासन शेतकर्‍यांसह सामान्य जनतेला न्याय देण्यात अपयशी ठरले असून अपयश झाकण्यासाठी शासनाकडून समाजात दुही माजविण्याचे कारस्थान सुरू असल्याचा आरोप तालुकाध्यक्ष  सांगळे यांनी केला. राज्यातच नव्हे तर देशात अतिशय हलाखीची परिस्थिती निर्माण झाली आहे. सामान्य लोकांचे जगणे सरकारने असह्य करुन ठेवले आहे.  नोटाबंदी, जी.एस.टी. सारखे निर्णय कुठलेही नियोजन न करता घेऊन सामान्य जनतेला सरकारने धक्के दिले आहेत, असा आरोपही सांगळे यांनी केला.

काँग्रेस पक्षात नव्याने प्रवेश केलेले शरद शिंदे यांच्यासह कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. शरद शिंदे यांना जिल्हा काँग्रेस कमिटीवर घेण्यात यावे असा ठरावही करण्यात आला.  यावेळी मुंबई काँग्रेसचे नेते रमेश दराडे, शहराध्यक्ष मुजाहिद खतीब, वामनराव उकाडे, मधुकर कपूर, जाकीर शेख आदींनी मनोगत व्यक्त केले. 

बैठकीस चैतन्य देशमुख, सचिन नाईक, ज्ञानेश्‍वर लोखंडे, नारायण भालेराव, गोपाळ गायकर, निवृत्ती मुंढे, बाळासाहेब शिंदे, शिवराम शिंदे, दिनेश चोथवे, उदय जाधव, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब शेळके, संजय चांडोले, किरण लोणारे, दामू शिंदे, ज्ञानेश्‍वर पवार, बाळासाहेब गोर्डे, दिलीप बागूल, गौतम निरभवणे, कमलाकर शेलार,   रत्नमाला साळवे, कैलास दातीर, सचिन आव्हाड, किरण खिंवसरा, किरण क्षत्रिय, रावसाहेब थोरात, दामू शेळके उपस्थित होते.