होमपेज › Nashik › सरकारी नोकरी असल्याचे सांगून विवाहितेची फसवणूक

सरकारी नोकरी असल्याचे सांगून विवाहितेची फसवणूक

Published On: Apr 29 2018 2:08AM | Last Updated: Apr 28 2018 11:18PMनाशिक : प्रतिनिधी

मुलगा सरकारी नोकरीला आहे, असे खोटे सांगून सासरच्या मंडळींनी फसवणूक करीत स्त्रीधन काढून घेत मानसिक व शारीरिक छळ केल्याचा आरोप विवाहितेने केला आहे. या प्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीनुसार म्हसरूळ पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या सहा लोकांविरोधात छळ, अपहार, फसवणूक, मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

स्वाती प्रवीण गांगुर्डे (रा. पोकार कॉलनी, दिंडोरी रोड) या विवाहितेने या प्रकरणी पती प्रवीण हिरामण गांगुर्डे (30) यांच्यासह  संतोष वाघ, लीलाबाई, हिराबाई गांगुर्डे, हिरामण रामजी गांगुर्डे, सागर हिरामण गांगुर्डे, निर्मला राजेंद्र भडांगे (सर्व रा. पोकार कॉलनी, दिंडोरी रोड) यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे. 1 एप्रिल 2015 ते 26 मार्च 2016 या कालावधीत सासरच्या लोकांनी फसवणूक केल्याचा आरोप स्वातीने केला आहे. पती प्रवीण यास सरकारी नोकरी असल्याचे खोटे सांगून सासरच्या लोकांनी फसवणूक केली. तसेच लग्नानंतर सासरच्या लोकांनी शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच माहेरच्यांनी लग्नात दिलेले सोन्याचे दागिने काढून घेत अपहार केला. त्यामुळे सासरच्या सहा लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Tags : Government job To say that Married womans Fraud