होमपेज › Nashik › सरकारमध्ये संवेदनशीलता नाही : छगन भुजबळ 

सरकारमध्ये संवेदनशीलता नाही : छगन भुजबळ 

Published On: Jul 28 2018 1:35AM | Last Updated: Jul 28 2018 12:19AMयेवला : प्रतिनिधी

शेतकरी सर्वसामान्य शेतकर्‍यांच्या प्रश्‍नाबाबत सरकार संवेदनशील नसून रस्त्यावर उरतण्याअगोदर सरकारकडून मदत व उपाययोजना का केल्या जात नाही, अशी सडकून टीका राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा आमदार छगन भुजबळ यांनी सरकारवर केली. त्यांच्या हस्ते येवला मतदारसंघात विविध विकासकामांचा प्रारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे, अंबादास बनकर, अरुण थोरात, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधकीसन सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य महेंद्रशेठ काले, संजय बनकर, पंचायत समितीचे माजी सभापती प्रकाश वाघ, येवला पंचायत समिती सभापती नम्रता जगताप, पंचायत समिती सदस्य मोहन शेलार, कोटमगावच्या सरपंच सोनाली कोटमे, महावितरणचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनविर, महावितरणचे कार्यकारी अधिकारी डोंगरे, कार्यकारी अभियंता राजेश पाटील, अधिक्षक अभियंता राजेश नरवडे, तालुकाध्यक्ष साहेबराव मडवई, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, बाजार समितीचे संचालक मकरंद सोनवणे, बाळासाहेब गुंड, सचिन कळमकर आदी उपस्थित होते.

भुजबळ पुढे म्हणाले की, सरकारवर पाच लाख कोटींहून अधिक कर्ज झाले आहे. मात्र, त्यातून कोणती विकासाची कामे झाले यांची माहिती विचारली की त्यांच्याकडे कुठलेही उत्तर न देता सत्ताधारी मंत्री सभागृहात धावून येतात, अशी टीका त्यांनी केली. सरकारने दिलेला हमीभावाचा दर तुटपुंजा असल्याचे त्यांनी सांगितले.