Thu, Jul 18, 2019 13:03होमपेज › Nashik › वृत्तपत्र वितरकांना शासकीय सुविधा द्या : पांडे

वृत्तपत्र वितरकांना शासकीय सुविधा द्या : पांडे

Published On: Aug 28 2018 1:34AM | Last Updated: Aug 28 2018 12:11AMनाशिक : प्रतिनिधी

वृत्तपत्र विक्रेत्यांचे कष्ट आणि आर्थिक उत्पन्न पाहता शासनाने वितरकांना शासकीय सुविधा देण्याची गरज असून, त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा उभारण्याचे आवाहन ज्येष्ठ पत्रकार राकेश पांडे यांनी केले. लखनौ येथे झालेल्या वितरकांच्या राष्ट्रीय संमेलनात ते बोलत होते. या संमेलनात 10 राज्यांतील 28 प्रतिनिधींसह महाराष्ट्र राज्य संघटनेचे कार्याध्यक्ष सुनील पाटणकर, बालाजी पवार उपस्थित होते. 

पांडे म्हणाले, वितरक हा कुठल्याही परिस्थितीची तमा न बाळगता आपले कर्तव्य पार पाडत असतो. मात्र, त्यांच्या प्रश्‍नांकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. त्यामुळे शासनाने याबाबत दखल घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच वितरकांचे अनेक प्रश्‍न त्यांनी यावेळी मांडले. पाटणकर म्हणाले की, वृत्तपत्रविक्रेता किती खडतरपणे आपले जीवन जगतो याचा कुणीही विचार करताना दिसत नाही. विक्रेत्याने स्वतःला नीट पाहिल्यास आपण किती कमजोर आहोत याची प्रचिती येईल असे सांगितले. तसेच कुठल्याही कंपनीच्या संस्थेच्या आमिषाला बळी पडतात. व्यवसाय केला पाहिजे असे सांगितले. आपले प्रश्‍न संघटित होऊनच सोडविले जाऊ शकतात, त्यामुळे सर्वांनी एकत्र आले पाहिजे असे सांगितले. विक्रेत्यांचे आर्थिक उत्पन्न वाढण्यासाठी कायम प्रयत्न केले पाहिजे असे सांगितले. तर महाराष्ट्रात नागपूर येथे 27 जानेवारी 2019 मध्ये होणार्‍या अधिवेशनाला उपस्थित राहण्याचे आवाहन हरिवंशराय यांनी केले.