Mon, Aug 19, 2019 09:06होमपेज › Nashik › तब्बल 60 टक्के मुली दडपणाखाली

तब्बल 60 टक्के मुली दडपणाखाली

Published On: Mar 08 2018 12:24AM | Last Updated: Mar 08 2018 12:23AMनाशिक : सुदीप गुजराथी

राज्याच्या ग्रामीण भागांतील तब्बल 60 टक्के मुलींवर कुटुंबीयांकडून येणे-जाणे, वर्तणूक, पोशाख यासंदर्भातील बंधने लादली जातात. 25 टक्के मुली मासिक पाळीविषयी कोणाशीही संवाद न साधता मौन बाळगतात, असे धक्‍कादायक निष्कर्ष एका सर्वेक्षणातून पुढे आले आहेत. ग्रामीण भागांतील 59 टक्के मुली दारिद्य्र व अन्य कारणांमुळे शाळेत जाऊ शकत नसल्याची बाबही या सर्वेक्षणातून समोर आली आहे. 

‘युनेस्को’तर्फे राबविण्यात आलेल्या एका पथदर्शी प्रकल्पांंतर्गत नाशिकच्या अभिव्यक्‍ती मीडिया फॉर डेव्हलपमेंट, युनेस्कोज् इन्स्टिट्यूट फॉर लाइफलाँग लर्निंग व अ‍ॅस्प्बे यांच्या वतीने काही दिवसांपूर्वी ‘शोधिनी’ कृती संशोधन प्रकल्प राबविण्यात आला. त्या अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील दुगाव, मनोली व कोचरगाव, तर धुळे जिल्ह्यातील वाघापूर व जैताणे या पाच गावांतील मुलींचे सर्वेक्षण करण्यात आले.

पैकी वाघापूर हा लहानसा पाडा, दुगाव व मनोली ही खेडी, तर कोचरगाव व जैताणे ही लहान गावे आहेत. निसर्गसंपन्‍न, आदिवासी बहुल व मूलभूत सोयी सुविधांचा अभाव असलेल्या या गावांतील मुलींना ‘अभिव्यक्‍ती’तर्फे विशेष प्रशिक्षण देण्यात आले. त्यांच्याकडून प्रत्येक गावातील 14 ते 25 या वयोगटांतील मुलींचे शिक्षण, लिंगभाव, कौशल्ये आणि सक्षमीकरण या मुद्यांच्या आधारे सर्वेक्षण करण्यात आले. सुमारे दीड वर्ष चाललेल्या या सर्वेक्षणातून अनेक धक्‍कादायक बाबी