होमपेज › Nashik › गॅस टँकर पेटला; चालकाचा होरपळून मृत्यू

गॅस टँकर पेटला; चालकाचा होरपळून मृत्यू

Published On: Aug 07 2018 1:00AM | Last Updated: Aug 06 2018 11:41PMसिन्‍नर /विंचूर दळवी : प्रतिनिधी

सिन्‍नर - घोटी मार्गावर पांढुर्ली शिवारात कोळनाला पुलावर सोमवारी (दि.6) सकाळी सव्वा अकराच्या सुमारास हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचा एलपीजी टँकर व लोखंडी साहित्य घेऊन जाणारा कंटेनर यांच्यात समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला त्यात टँकरने पेट घेतला. दरम्यान, या घटनेत गॅस टँकरचालकाचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. रवि यादव (32, रा. उत्तर प्रदेश) असे मृत चालकाचे नाव आहे.क्‍लीनर जितेंद्र यादव (25) याने प्रसंगावधान राखत टँकरमधून उडी मारल्याने त्याचा जीव वाचला.  तब्बल सात तास अथक प्रयत्न करीत विविध ठिकाणच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.

मुंबई येथील दीपा रोडवेजचा  औरंगाबादकडे जाणारा एलपीजी टँकर (क्र.एनएल 01, क्यू 5460)  व सिन्‍नर बाजूकडून घोटीच्या दिशेने लोखंडी साहित्य घेऊन जाणारा कंटेनर (क्र. सीजी 07, एमबी 6513) यांच्यात पांढुर्ली (पान 1 वरून) शिवारातील कोळनाला पुलावर जोरदार धडक झाली. कंटेनरने ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या नादात टँकरला धडक दिल्याने हा अपघात घडला. अपघातात ज्वालाग्राही गॅसची गळती झाल्याने क्षणार्धात टँकरने पेट घेतला. त्यामुळे आगीचे लोळ आकाशात झेपावू लागले आणि परिसरात एकच खळबळ उडाली. महामार्गावरील प्रवाशांनी हा प्रकार बघितल्यानंतर वाहने अपघातग्रस्त टँकरपासून काही अंतरावर उभी केली. मात्र, काही प्रवासी वाहने घटनेचे गांभीर्य अव्हेरून रस्त्याच्या कडेने ये-जा करीत होते. 

स्थानिक नागरिकांनी घटनेबाबत सिन्‍नर पोलीस ठाण्यास माहिती दिली. पोलीस उपअधीक्षक माधव पडिले, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्यासह पथक घटनास्थळी धावले. त्यांनी अग्निशमन बंबांना पाचारण करून आग आटोक्यात आणण्यासाठी कार्यवाही सुरू केली. त्याचदरम्यान रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्यामुळे घटनास्थळापासून दोन्ही बाजूस वाहनांच्या दोन किमीपर्यंत रांगा लागल्या होत्या. आरंभी अपघातातील दुसरे वाहन कोणते किंवा काही जीवितहानी झाली काय? याबाबत कोणालाही काही सांगता येत नव्हते. त्यामुळे सर्वांचीच धाकधूक वाढली होती. चालकाचा होरपळून मृत्यू झाल्याचे सायंकाळी 6.30 च्या सुमारास स्पष्ट झाले.  

दरम्यान, सकाळी अपघाताची माहिती वार्‍यासारखी पसरल्यानंतर महामार्गावर दोन्ही बाजूस नागरिकांनीदेखील मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यांना आवरताना पोलिसांच्यादेखील नाकीनव आले.तथापि, भगूर व सिन्‍नर नगर परिषदेसह नाशिक महानगरपालिका, सिन्‍नर एमआयडीसी, देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड आदींचे अग्निशमन बंब घटनास्थळी मदतकार्यास्तव दाखल झाले. माळेगावचे अग्निशमन अधिकारी प्रवीण घोलप, नाशिक मनपाचे अनिल जाधव, भगूर नपाचे परशुराम कुटे, सिन्‍नर नपाचे लाला वाल्मीकी, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे राजेंद्रसिंह ठाकूर आदींच्या मार्गदर्शनाखाली टँकरला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी जवानांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू झाले. पाच बंब सातत्याने प्रयत्नशील होते. पाचही बंबांतील पाणी संपल्यानंतर परिसरातील शेतकरी श्रीराम लक्ष्मण वाजे यांनी स्वमालकीच्या विहिरीतून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पाणी घेण्याची परवानगी दिली. त्यामुळे मदतकार्यात येऊ पाहाणारा अडथळा दूर झाला.

दरम्यान, तहसीलदार नितीन गवळी, मंडल अधिकारी संजय गाडे, तलाठी श्रीमती सी. डी. गांगुर्डे,  एचपी कंपनीचे व्यवस्थापक अखिल पचोरी, सिन्‍नर प्लँटचे व्यवस्थापक एन. के. शुक्‍ला आदींनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. दुपारी साडेचारच्या सुमारास टँकरची आग बर्‍यापैकी आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. सायंकाळपर्यंत वाहतुकीसाठी मार्ग बंदच होता. शिवारातील कोळनाला पुलावर जोरदार धडक झाली. कंटेनरने ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या नादात टँकरला धडक दिल्याने हा अपघात घडला. अपघातात ज्वालाग्राही गॅसची गळती झाल्याने क्षणार्धात टँकरने पेट घेतला. त्यामुळे आगीचे लोळ आकाशात झेपावू लागले आणि परिसरात एकच खळबळ उडाली. महामार्गावरील प्रवाशांनी हा प्रकार बघितल्यानंतर वाहने अपघातग्रस्त टँकरपासून काही अंतरावर उभी केली. मात्र, काही प्रवासी वाहने घटनेचे गांभीर्य अव्हेरून रस्त्याच्या कडेने ये-जा करीत होते. 

स्थानिक नागरिकांनी घटनेबाबत सिन्‍नर पोलीस ठाण्यास माहिती दिली. पोलीस उपअधीक्षक माधव पडिले, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्यासह पथक घटनास्थळी धावले. त्यांनी अग्निशमन बंबांना पाचारण करून आग आटोक्यात आणण्यासाठी कार्यवाही सुरू केली. त्याचदरम्यान रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्यामुळे घटनास्थळापासून दोन्ही बाजूस वाहनांच्या दोन किमीपर्यंत रांगा लागल्या होत्या. आरंभी अपघातातील दुसरे वाहन कोणते किंवा काही जीवितहानी झाली काय? याबाबत कोणालाही काही सांगता येत नव्हते. त्यामुळे सर्वांचीच धाकधूक वाढली होती. चालकाचा होरपळून मृत्यू झाल्याचे सायंकाळी 6.30 च्या सुमारास स्पष्ट झाले.