Wed, Nov 14, 2018 20:52होमपेज › Nashik › गंगापूर ७७ टक्के, भावली ओव्हरफ्लो

गंगापूर ७७ टक्के, भावली ओव्हरफ्लो

Published On: Jul 21 2018 1:32AM | Last Updated: Jul 21 2018 12:25AMनाशिक : प्रतिनिधी

इगतपुरीत सुरू असलेल्या संततधारेमुळे तालुक्यातील भावली धरण शुक्रवारी (दि.20) ओव्हरफ्लो झाले. गंगापूरच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणाचा विसर्ग सायंकाळी 1500 वरून 2,096 क्यूसेकपर्यंत वाढविण्यात आला. तर दारणातूनही 1,100 क्यूसेक वेगाने पात्रात पाणी सोडले जात आहे. 

गंगापूर धरण 77 टक्के भरले असून, धरणात 4,333 दलघफू एवढा साठा आहे. इगतपुरी तालुक्यातील दारणानंतर भावली धरण 81 टक्के भरले असून, धरणात 5,773 दलघफू साठा आहे. भावली हे शंभर टक्के भरले आहे. नांदूरमध्यमेश्‍वरमधून 6,310 क्यूसेकने विसर्ग केला जात आहे.