Fri, Apr 26, 2019 09:22होमपेज › Nashik › काटेकोर मोजणीनंतरच गणेशोत्सव मंडपांना परवानगी

काटेकोर मोजणीनंतरच गणेशोत्सव मंडपांना परवानगी

Published On: Sep 06 2018 10:47PM | Last Updated: Sep 06 2018 10:47PMनाशिक : प्रतिनिधी

गणेशोत्सव मंडळांचे मंडप आणि देखावे रस्त्यात वाहतुकीला अडथळा ठरू नये यासाठी महापालिकेकडून मंडळांना परवानगी देताना मोजमाप करूनच परवानगी दिली जात आहे. यामुळे किमान यंदा तरी गणेश मंडळांच्या मंडपापासून रस्ते मोकळे श्‍वास घेतील, अशी आशा व्यक्‍त केली जात आहे. न्यायालयाने घालून दिलेल्या नियम व अटी-शर्तींची महापालिकेकडून काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे प्रयत्न केले जात आहे. त्या अनुषंगाने मनपा आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी विविध कर विभागामार्फत परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.

सार्वजनिक उत्सवाप्रसंगी रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी मंडप व स्टेज कमान तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यास परवानगी देण्याबाबत नियमावलीची अंमलबजावणी केली जात आहे. शहरासह परिसरातील सुमारे 200 गणेश मंडळांना आतापर्यंत मनपाकडून परवानगी दिली जात असून, प्रत्येक विभागीय कार्यालयात त्यासाठी एक खिडकी योजनेची व्यवस्था करण्यात आली आहे.