Thu, Jun 27, 2019 11:41होमपेज › Nashik › गामणे यांचा सत्कार ठरेल आदर्श : डॉ. लहाने

गामणे यांचा सत्कार ठरेल आदर्श : डॉ. लहाने

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नाशिक  : प्रतिनिधी 

आजच्या आधुनिक काळात सच्चा माणूस मिळणे कठिण आहे. अशा स्थितीत बाळासाहेब गामणे यांच्यासारख्या सच्च्या माणसाचा हा सत्कार नवीन पिढीसाठी आदर्श असल्याचे  प्रतिपादन पद्मश्री डॅा. तात्याराव लहाने यांनी  केले. 

नागरी सत्कार समितीतर्फे  लोकमित्र बाळासाहेब गामणे यांचा हनुमानवाडीतील श्रध्दा लॅान्स येथे नागरी सत्कार सोहळा पार पडला. प्रसंगी व्यासपीठावर महामंडलेश्वर शांतिगीरी महाराज, महापौर रंजना भानसी,  जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार, माजी खा. प्रताप वाघ, आमदार जयवंत जाधव, बाळासाहेब सानप, सीमा हिरे, देवयानी फरांदे, सुधीर तांबे, आ. राजाभाऊ वाजे, माजी मंत्री तुकाराम दिघोळे, शोभा बच्छाव, डॉ. कैलास कमोद, शाहु खैरे, गुरूमीत बग्गा आदी उपस्थित होते. प्रमुख अतिथींच्या हस्ते लोकमित्र बाळासाहेब गामणे, मीराताई गामणे यांचा मानपत्र, स्मृतिचिन्ह देवून नागरी सत्कार करण्यात आला. प्रमुख अतिथींच्या हस्ते लोकमित्र या गौरवग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले. प्रास्ताविक नागरी सत्कार समितीचे पदाधिकारी तथा माहिती संचालक  शिवाजी मानकर यांनी केले. क्रांतिवीर वसंतराव नाइक शिक्षण संस्थेचे सरचिटणीस हेमंत धात्रक यांनी आभार मानले. कार्यक्रमास सत्कार समितीचे अध्यक्ष राधाकिसन चांडक, डॅा. डी. एल. कराड, आदिवासी आयुक्त अर्जुन कुलकर्णी, क्रांतिवीर व्ही. एन. नाइक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी आव्हाड, पंढरीनाथ थोरे, माधवराव पाटील, नितीन भोसले, पुंजाभाऊ सांगळे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरीक उपस्थित होते.

Tags : Nashik, Nashik News, Gamane, felicitated, Model, Dr Lahane


  •